सोलापूर : जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेत सोलापूरच्या रिद्धी उपासे, स्वराली हातवळणे व मानस गायकवाड यांनी चांगले यश संपादन केले आहे.
डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने सोलापूर चेस अकॅडमीने आयोजित केलेल्या १४ वर्षाखालील व अमॅच्युअर जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वराली हातवळणे हिने पाच पैकी पाच गुण प्राप्त करत मुलींच्या गटात तर मुलांच्या गटात अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त मानस गायकवाड याने सहापैकी सहा गुण मिळवीत स्पर्धेत वर्चस्व राखत अजिंक्यपद पटकाविले. तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू रिद्धी उपासे हिने इलो १७०० गुणांकनाखालील अमॅच्युअर गटात चारपैकी साडेतीन गुण मिळवीत सरस बोकोल्स गुणावर स्पर्धेच्या विजेतेपदास गवसणी घातली.
आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू अनुज दुधगी (५ गुण), सृष्टी गायकवाड (४ गुण) व प्रज्वल कोरे (३ गुण) यांनी अनुक्रमे १४ वर्षाखालील मुले व मुलींच्या तसेच अमॅच्युअर गटात उपविजेतेपद पटकावत आपले संघातील स्थान निश्चित केले.
In district level selection chess competition Success of children in Solapur
https://www.facebook.com/109399567404448/posts/525951415749259/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ समर्थ ज्वेलर्सचे मालक सोमा शरणार्थी, असोसिएशनचे सचिव सुमुख गायकवाड, पोलीस हवालदार रमेश जाधव, उद्योजक धनंजय माने, जगदीश मगाई, माळशिरस तालुका संघटनेचे अध्यक्ष अभिजित बावळे, प्रमुख पंच उदय वगरे, प्रशांत पिसे, रोहिणी कोंडा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
प्रथम आलेल्या दोन खेळाडूंची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झालेली आहे. विजेत्या खेळाडूंना चषक व मेडल देऊन गौरविण्यात आले. विजेत्या खेळाडूंचे सोलापुर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, अकॅडेमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर, रवींद्र जयवंत, अतुल कुलकर्णी, नितीन काटकर, प्रशांत गांगजी, गोपाळ राठोड आदींनी अभिनंदन करत राज्यस्तरीय स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या.
● अंतिम निकाल खालीलप्रमाणे:
१) रिद्धी उपासे २) प्रज्वल कोरे ३) निनाद कुलकर्णी ४) प्रेरणा पवार ५) अखिलेश खरात
》१४ वर्षाखालील गट (मुले) :
१) मानस गायकवाड २) अनुज दुधगी ३) आर्यन मगई ४) यथार्थ पाटील ५) गणेश पवार
》१४ वर्षाखालील गट (मुली):
१) स्वराली हातवळणे २) सृष्टी गायकवाड ३) रक्षिता जाधव ४) संस्कृती माने ५) सरिस्का बावळे
》 उत्तेजनार्थ पारितोषिके-:
दहा वर्षाखालील गट -: १) अखिलेश जावळे २) सहिष्णू आपटे ३) सुहित धामणगावकर व समर्थ शरणार्थी
आठ वर्षाखालील गट : १) विहान कोंगारी २) प्रेयस वाघमारे ३) रेयांश दुलंगे
सहा वर्षाखालील गट: १) कार्तिक काळे २) प्रितस वाघमारे
https://www.facebook.com/109399567404448/posts/525928629084871/