पुणे : पिंपरी चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी बारामतीत गोविंद बाग येथे आले आहेत. कृष्ण प्रकाश यांची पिंपरी चिंचवडच्या पोलिस आयुक्त पदावरून गृहखात्याने बदली केली आहे. त्यामुळे कृष्ण प्रकाश हे नाराज असल्याचे बोलले जात आहे. बदलीला स्थगिती द्यावी यासाठी कृष्ण प्रकाश हे शरद पवारांच्या भेटीला आले असल्याचे बोलले जात आहे.
नुकत्याच झालेल्या वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडचे मावळते पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. आज सकाळीच कृष्णप्रकाश अचानकच गोविंदबाग येथे आले. त्यांनी पवार यांच्याशी दहा ते बारा मिनिटे संवाद साधला आणि तेथून ते निघून गेले. नेमकी काय चर्चा झाली याची माहिती त्यांनी देण्यास नकार दिला. ही खाजगी भेट होती इतकेच त्यांनी या भेटीबाबत सांगितले.
खास बाब म्हणजे कृष्ण प्रकाश हे देखील या तडकफडकी बदलीमुळे भलतेच नाराज झाल्याचे दिसत आहेत. म्हणूनच ते आज थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये शरद पवारांच्या शब्दाला किती महत्व हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. म्हणूनच कृष्ण प्रकाश आज शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी शरद पवारांना साकडं घालायला गेल्याची चर्चा सुरु आहे.
IPS Krishna Prakash is in Baramati for Sharad Pawar’s visit
https://www.facebook.com/109399567404448/posts/526642735680127/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
या बदलीला स्थगिती मिळावी यासाठी ते शरद पवारांच्या दरबारात पोहोचल्याच्या चर्चा आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशांच्या बदलीसोबत ठाणे आणि कोकणातल्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. मात्र त्या बदल्यांना मंत्री एकनाथ शिंदेंनी अवघ्या बारा तासात स्थगिती दिली. अशीच स्थगिती मिळवण्यासाठी कृष्ण प्रकाश प्रयत्न करत आहेत.
राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या बदल्या झाल्यानंतर त्यात कृष्णप्रकाश यांचाही नंबर लागल्यानंतरच या बाबत चर्चा सुरु झाली होती. पवार यांनाही कोल्हापूरला जाण्याची घाई होती, त्या मुळे त्यांनीही माध्यमांशी संवाद साधला नाही. दरम्यान अंकुश शिंदे यांनी पदभारही स्विकारल्याने आता या भेटीचे नेमके काय कारण असू शकेल याचीही चर्चा होती. दुसरीकडे कृष्णप्रकाश यांना थांगपत्ता न लागू देता बदली केली गेल्याचीही जोरदार चर्चा आहे, कारण बदली झाली तेव्हा ते परदेशात होते, असेही बोलले जात आहे. दरम्यान बदलीनंतर त्यांनी पवार यांच्याशी संवाद साधत आज चर्चा केली.
आयुक्त पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच कृष्ण प्रकाश अचानक झालेल्या बदलीने नाराज झाले आहेत. त्यांची नाराजी व्यक्त करण्यासाठी परदेशातून येताच शरद पवारांची भेट घेतली. आता पुढे काय होईल हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.