मुंबई : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही माघार घेत आहोत. आम्ही मातोश्रीवर जाणार नाही. रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली. मोदींच्या दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आम्ही माघार घेत आहोत, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, पंतप्रधान मोदी उद्या (रविवार) मुंबईत येणार आहेत.
आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर जाण्यापासून माघार घेतली आहे. रवी राणांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे की, उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीमुंबई दौऱ्यावर येणार आहेत. एक आमदार म्हणून आणि एक खासदार म्हणून आमचं कर्तव्य आहे. महाराष्ट्रात आणि मुंबईत जर मोठी व्यक्ती येत असेल तर त्यांच्या दौऱ्याचे समर्थन केलं पाहिजे. प्रत्येकाचा सन्मान केला पाहिजे स्वागत केलं पाहिजे परंतु मुख्यमंत्र्यांना वाटतंय की, अशा प्रकारे कायदा सुव्यवस्था बिघडू द्या पंतप्रधानांचा दौरा रद्द झाला पाहिजे. वेळात वेळ काढून पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर येत असतील तर मुंबईसाठी अभिमानाची गोष्ट आहे. असे रवी राणा यांनी म्हटलं आहे.
मुंबईत खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस त्यांना खार पोलिसात घेऊन गेले आहेत. यावेळी राणा दाम्पत्याच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा झाल्याचे दिसून आले. दरम्यान आधी त्यांनी पोलिसांसोबत जाण्यास नकार दिला होता. आज राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा आंदोलन करणार होते. मात्र त्यांनी हे आंदोलन मागे घेतले.
राणा दाम्पत्यानं हनुमान चालिसा आंदोलन मागे घेतले आहे. पण राणा दाम्पत्यानं आधी माफी मागावी तेव्हाच घराबाहेर पडावं अशी शिवसैनिकांची मागणी आहे. दरम्यान रवी राणा यांच्या मुंबईच्या घराखाली हजारो शिवसैनिक सध्या जमले, परिसरात तणावपूर्ण परिस्तिथी आहे. राणा दाम्पत्यांना सुखरूप घराबाहेर काढण्याचा प्रयत्न सध्या मुंबई पोलीस करत आहेत.
Eventually, the Rana couple withdrew from the agitation and were taken into police custody
https://www.facebook.com/109399567404448/posts/526361675708233/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
रवी राणा म्हणाले की, आमचा आग्रह हनुमान चालिसासाठी होता. मात्र मुख्यमंत्री ठाकरे कायदा सुव्यवस्था बिघडवत आहेत. आमच्यावर कुणाचाही दबाव नाही. आम्ही स्वताहून हे आंदोलन मागे घेत आहोत. बाळासाहेबांचे विचार थोडेसे जरी तुमच्यात असतील तर तुम्ही योग्य मार्गावर नक्की याल, असं राणा म्हणाले. भगवान राम आणि हनुमानाचा यांनी अवमान केला आहे. राम भक्त आणि हनुमान भक्त यांना धडा शिकवतील, असंही ते म्हणाले.
राणा दाम्पत्यानं हनुमान चालिसा आंदोलन मागे घेतले आहे. पण राणा दाम्पत्यानं आधी माफी मागावी तेव्हाच घराबाहेर पडावं अशी शिवसैनिकांची मागणी आहे. दरम्यान रवी राणा यांच्या मुंबईच्या घराखाली हजारो शिवसैनिक सध्या जमलेले आहेत, परिसरात तणावपुर्ण परिस्तिथी आहे. राणा दाम्पत्यांना सुखरूप घराबाहेर काढण्याचा प्रयत्न सध्या मुंबई पोलीस करत आहेत.
राणा दाम्पत्य आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक झाली. राणा यांनी वारंटची मागणी करत, हाय वोल्टेज ड्रामा केला. दरम्यान पोलीस आणि राणा यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर पोलिसांनी राणा दाम्पत्याला त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेत, अटक केले.
राणा यांच्यावर भा. दं. क. १५३ (अ) अन्वये अटक करण्यात आली आहे. यामुळे अखेर पोलिसांनी शिवसेनेच्या तक्रारीवरून राणा दाम्पत्यावर कारवाई केली आहे. कालपासूनच राणा यांच्या आंदोलनाची चर्चा होती. मातोश्रीबाहेर शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर जमले होते. नवनीत राणा यांच्या घराबाहेर ही शिवसैनिकांनी घोषणा दिल्या. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी शक्यात होती. अपेक्षेप्रमाणे नवनीत राणा यांच्या विरोधात कारवाई करून पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली. आता पोलीस राणा दाम्पत्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/526110099066724/
रवी राणा यावेळी म्हणाले की, आमच्या अमरावती आणि मुंबईतील घरावर हल्ला झाला. त्यावेळी सुरक्षा व्यवस्था कुठं होती. पवारांच्या घरावर हल्ला होतो यावरुन राज्यात कायदा सुव्यवस्था काय आहे हे लक्षात येतं. आमच्या घरावर हल्ला केल्यानंतर आता काय कारवाई करणार हे पाहणार आहे, असं राणा म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांवर तेच गुन्हे दाखल व्हायला हवेत जे शरद पवार यांच्या घरावर आंदोलन केलेल्या लोकांवर दाखल केले आहेत, असं राणा म्हणाले. आमच्या घरात शिवसैनिक घुसले, पोलिसांनाही धक्काबुक्की केली. याबाबत आम्ही तक्रार करणार आहोत, असंही राणा म्हणाले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/526030722407995/