पंढरपूर : ‘शेतकऱ्यांचा राजवाडा’ अशी ओळख असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची गेल्या तीन चार वर्षात दयनीय अवस्था झाली आहे. विद्यमान चेअरमन व संचालक मंडळाने केलेल्या गलथान कारभारांमुळे शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची बिले कारखान्याकडे थकीत असून कामगारांचे पगारही अद्याप मिळालेले नाहीत. त्यातच विठ्ठलच्या निवडणुकीचे बिगुल सध्या वाजले असून वातावरण तापत आहे. तुंगत (ता. पंढरपूर ) येथील विचार विनिमय बैठकीत धाराशिव कारखान्याचे चेअरमन, उद्योगपती अभिजित पाटील यांनी विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
यावेळी तुंगत गटातील शेतकरी सभासदांच्या वतीने अभिजीत पाटील यांचा सत्कार केला. यावेळेस अभिजीत पाटील म्हणाले, आपण उस्मानाबाद, नाशिक, नांदेड व सांगोला हे ४ बंद पडलेले परजिल्ह्यातील साखर कारखाने चालवून त्यांना ऊर्जितावस्थेत आणण्याचे काम केले आहे. परंतू मी ज्या कारखान्याचा फाऊंडेशन सभासद आहे तो कारखाना आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा अशी ओळख असणारा विठ्ठल कारखाना गेल्या दोन वर्षांपासून संचालक मंडळाचे चुकीचे धोरणामुळे बंद स्थितीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह या ठिकाणच्या कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांची होणारी हेडसांळ लक्षात घेऊन आपण या निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे. शेतकऱ्यांनी विश्वास दाखवून माझ्यावर जबाबदारी सोपविल्यास कारखान्याची मोळी टाकण्याअगोदर सर्व शेतकऱ्यांची थकीत बिले, वाहतूकदारांची तोडणी बिले, कर्मचाऱ्यांचे पगार देऊनच मोळी टाकणार असल्याचे आश्वासन दिले.
गत दोन वर्षांपासून विठ्ठल कारखाना बंद स्थितीत असल्याने पंढरपूरच्या बाजारपेठेवरही याचा परिणाम झाला आहे. कारखान्याच्या सभासदांना कर्मवीर औदुंबरअण्णा यांच्या कार्यकाळात मानसन्मान प्रतिष्ठा होती, ती आता राहिलेली नाही. हाच मान सन्मान पुन्हा आणण्यासाठी सभासदांनी माझ्यावर विश्वास दाखवून जबाबदारी सोपवली तर मी कारखान्याची गाडीच काय डिझेल, भत्ताही घेणार नाही आणि एक रुपया घरी नेणार नाही, अशी शपथच त्यांनी उपस्थित सभासदासमोर घेतली.
Abhijeet Patil blew the trumpet of election of Vitthal Sugar Factory
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ ‘विठ्ठल’चा चेअरमन झाला की आमदारकीचे स्वप्न पडतात
यावेळी बोलताना डॉक्टर योगेश रणदिवे म्हणाले, अभिजीत पाटील साखर कारखानदारीतील डॉक्टर आहेत आगामी काळात विठ्ठल च्या माध्यमातून शेतकरी सभासदांचा ऊस वेळेत गळीतास जाऊन बिले वेळेत मिळाल्यास शेतकऱ्यांना बाकीचं काही देणंघेणं नाही. बाहेर सभासदांमध्ये कुजबूज आहे, पंढरपूर तालुक्याचा इतिहास आहे विठ्ठलचा चेअरमन झाला की आमदारकीची स्वप्ने पडतात आणि कारखान्याची वाट लागते हा इतिहास आहे. या निमित्ताने मी विनंती करतो, आपण आमदार खासदार मंत्री व्हा आमच्या शुभेच्छा आहेत. परंतु सर्वांचे साक्षीने शब्द द्यावा की जोपर्यंत विठ्ठल कारखाना कर्जमुक्त होत नाही, तोपर्यंत आमदारकीचे स्वप्न पाहणार नाही आणि त्यातून ह उशीर होत असल्यास आम्ही आमचे नेत्याकडे आपल्या विधान परिषदेसाठी आग्रह करू, असे रणदिवे यांनी सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/526059502405117/
□ विठ्ठल हॉस्पिटल जाण्याची भीती – डाॅ. लामकाने
विठ्ठल कारखान्याचे निवडणुकीमध्ये विठ्ठल कारखान्यावर सत्तांतर झाल्यास आपल्या ताब्यातील विठ्ठल हॉस्पिटल जाईल, अशी भीती काही जणांना वाटत आहे. आणि तसे झाल्यास हॉस्पिटलच्या माध्यमातून पाटील हे विठ्ठलच्या सभासदांसाठी मोफत उपचार सुरु केल्याशिवाय राहणार नाहीत. सत्ताधारी मंडळींना कारखान्याच्या निवडणुकीचे काही नाही परंतु विठ्ठल हॉस्पिटल हातातून जाईल याची भीती वाटत असल्याचे मत डॉ. पंकज लामकाने यांनी बैठकीत व्यक्त केले.
□ २५ वर्षात मी विठ्ठलचा संचालक असताना अशी दैनी अवस्था कधीच बघितली नाही – ॲड. चव्हाण
विठ्ठल कारखान्यावर झालेला भ्रष्टाचार हा पाहवत नाही आणि कोट्यावधी कर्जाचा डोंगर उभा केला आहे. ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी, वाहतूक ठेकेदारांची बील दोन – तीन वर्ष मिळत नाहीत. ही दयनीय अवस्था पाहून वेदना होतात. यामुळे औदुंबरआण्णाच्या काळातील कारखाना बघायचा असेल तर सभासदांनी प्रामाणिकपणे अभिजीत पाटलांच्या मागे खंबीर उभा रहावे. नक्कीच आण्णांच्या काळातील दिवस पुढे आणू, असे ॲड. विश्वभंर चव्हाण म्हणाले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/525951415749259/