मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केला आहे. मला कोल्हापूरमध्ये इंजेक्शन देउन मारण्याचा प्लॅन होता, असं त्यांनी म्हटलं. मुंबईतल्या पोलखोल सभेनंतर ते बोलत होते. ‘राणा दाम्पत्याला जेलमध्ये अतिशय वाईट वागणूक दिली जात असून आपल्यालाही कोल्हापूरमध्ये इंजेक्शन देऊन मारण्याचा प्लान होता’, असं ते म्हणाले.
भाजप आमदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केला आहे. मला कोल्हापूरमध्ये इंजेक्शन देउन मारण्याचा प्लॅन होता, असा घणाघाती हल्ला नितेश राणे यांनी केला आहे.
“राणा दाम्पत्याला जेलमध्ये अतिशय वाईट वागणूक दिली जात असून आपल्यालाही कोल्हापूरमध्ये इंजेक्शन देऊन मारण्याचा प्लान होता” असा घणाघाती आरोप भाजप आमदार नितेश राणेंनी केला. ते मुंबईतल्या पोलखोल सभेनंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळेस त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.
I had a plan to inject and kill – Nitesh Rane
https://www.facebook.com/109399567404448/posts/528260355518365/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
“मोहित कंबोजांवरही हल्ला झाला. आता राणा दाम्पत्याचा छळ सुरूंय असून सरकार सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोपही नितेश राणांनी केलाय. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याला चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे या दोघांना भायखळा आणि तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी इशारा दिलाय. हिंदूत्व सोडल्याची गेले काही दिवस माझ्यावर टीका होत आहे. हिंदूत्व म्हणजे धोतर आहे का, घालावे आणि मग सोडावे. जे नकली व तकलादू हिंदूत्ववादी आले आहेत, मला त्यांचा समाचार घ्यायचा आहे आणि तो लवकरच घेणार, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
□ मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख
चल दाखव, तुझे पोलीस हटव,,आणि दादागिरी करायला रस्त्यावर उत्तर. पोलीस २४ तास तुझ्या आजूबाजूची हटव , तुझ्या दोन्ही पोरांना घेऊन स्वतः रस्त्यावर खाली उतर, बंगल्यात बसू नकोस” असा मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांनी टीका केली आहे. तर नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याबाबतही त्यांनी पुन्हा भाष्य केले आहे. आता बदल झालाच पाहिजे. आत मध्ये छळ सुरू आहे. मलाही कोल्हापुरात इंजेक्शन देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता.
खार पोलीस स्टेशनला पोलीस रात्री घेऊन गेले, मग संताक्रूजला. त्यांना साधा पंखा दिला नाही, कालपासून रुग्णालयात नेण्यास बोलतात, तरीही त्यांना जेजे मध्ये घेऊन जात नाहीत, त्यांची तपासणी होऊ देत नाहीत, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.