मुंबई : खासदार नवनीत राणा यांना कोठडीत हीन वागणूक मिळत असल्याचा गंभीर आरोप झाला होता. यावर आता मुंबई पोलीस आयुक्तांकडून थेट पुराव्यासह उत्तर देण्यात आले आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी नवनीत राणा यांचा पोलीस स्टेशनमध्ये चहा पीत असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच राणा यांचे सर्व आरोप फेटाळत, आम्हाला अजून काही बोलायची गरज आहे का ? अशी विचारणा पांडे यांनी केली आहे.
खासदार नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ आणि अनुसूचित जातीमधील असल्यामुळे पाणी दिले नाही असा आरोप केला होता. पोलिसांकडून हीन वागणूक देण्यात आल्याचा आरोप नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांवर केला होता.
खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून तुरुंगात मिळालेल्या वागणुकीबद्दल गंभीर आरोप केले. “मला 23 एप्रिल 2022 रोजी खार पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. मी संपूर्ण रात्र पोलीस स्टेशनमध्ये काढली. मी पिण्यासाठी पाणी मागितले, पण मला रात्रभर पाणीही दिले नाही. पाणी मागितल्यामुळे मला जातीवाचक शिवीगाळ केली. मी अनुसूचित जातीची आहे, यामुळे मला पाणी पिण्यासारखा मूलभूत हक्कही नाकारण्यात आला.”
यामध्ये राणा दाम्पत्य पोलीस ठाण्यात चहा पित असताना दिसत आहे. दोघांसमोर पाण्याच्या बाटल्या आहेत. राणा दाम्पत्य खुर्चीत बसून चहा पित असताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.
Video of Navneet Rana with live evidence goes viral by police
Do we say anything more pic.twitter.com/GuUxldBKD5
— sp (@sanjayp_1) April 26, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
पोलीस ठाण्यात पाणी देण्यात आलं नाही. वॉशरुमलाही जाऊ दिलं नाही, असे आरोप खासदार नवनीत राणांकडून करण्यात आले होते. त्या संदर्भात त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं. यानंतर गृह मंत्रालयानं राज्य सरकारला सविस्तर अहवाल देण्यास सांगितला. या घडामोडी सुरू असताना मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंनी राणा दाम्पत्याचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.
राणा दाम्पत्याला शनिवारी अटक झाली. त्यांना खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. त्यावेळचा व्हिडीओ पांडेंनी शेअर केला आहे. ‘आम्ही अधिक काही बोलायची गरज आहे का?’ असं पांडेंनी ट्विटसोबत म्हटलं आहे. त्यामुळे राणा यांच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
खासदार नवनीत राणा यांनी सामाजिक तेढ निर्माण करणारे विधान केले आहे.यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान नवनीत राणा यांना अटक केल्यानतंर खार पोलीस ठाण्यात पोलिसांनी शिवीगाळ केला असल्याचा आरोप केला आहे. पाणी मागितल्यावर जातीवाचक शिवीगाळ केली, तसेच अनुसूचित जातीमुळे पाणीसुद्धा देण्यात आले नाही. असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. यानंतर आता मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी व्हिडीओ ट्विट करत राणांचा दावा फेटाळला आहे. राणा पोलीस ठाण्यात चहा पीत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/528465362164531/
दरम्यान पिण्यासाठी पाणी मागितल्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप राणा यांनी केला होता. परंतु व्हिडीओमध्ये नवनीत राणा यांच्या समोर मिनरल वॉटर पाण्याची बाटली ठेवण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या दोन व्यक्तींनासुद्धा पोलीस ठाण्यात चहा देण्यात आली असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. संजय पांडे यांच्या व्हिडीओमुळे खासदार नवनीत राणांचा दावा खोटा असल्याचे दिसत आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/528260355518365/