# वर्षाच्या अखेरीस होणार रिलीज
मुंबई : ‘गदर 2’ सिनेमाचे दुसऱ्या टप्प्यातील शूटिंग पूर्ण झाले आहे. जवळपास या चित्रपटाचे शूटिंग सध्या पूर्ण होत आले आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर चित्रपटाच्या टीमने आतापर्यंत जवळपास 80 टक्के शूटिंग पूर्ण केले आहे. हा चित्रपट यावर्षीच्या नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये येऊ शकतो. हीट सिनेमा गदरचा हा दुसरा भाग आहे.
‘गदर’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन 20 वर्ष झाली आहेत. या चित्रपटात ‘सकिना’ ही भूमिका अमिषा पटेलने, तर ‘तारा सिंह’ ही भूमिका सनी देओलने साकारली होती. कोणीही विसरू शकणार नाही असा हा चित्रपट होता. या चित्रपटातील दोन्ही कलाकारांच्या दमदार अभिनयाने लोकांना वेड लावले. दिग्दर्शक – निर्माता अनिल शर्मा दिग्दर्शित आणि झी स्टुडिओज निर्मित, या चित्रपटात पुन्हा एकदा तारा सिंह आणि सकिना अर्थात सुपरस्टार सनी देओल, अमिषा पटेल यांची जोडी पाहायला मिळणार आहे. ‘गदर 2’ हा चित्रपट वर्षाच्या अखेरीस थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल अभिनित ‘गदर’ या चित्रपटाच्या सिक्वेलची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचे दुसऱ्या टप्प्यातील चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. चित्रपटाचे हे चित्रीकरण ‘लखनऊ’मध्ये सुरु होते. या चित्रपटात देखील सनी आणि अमिषाची जोडी झळकणार आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ या आयकॉनिक चित्रपटाचा हा सिक्वेल असणार आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा आयकॉनिक पीरियड ड्रामा चित्रपट ‘गदर 2’ ची शूटिंग लखनऊमध्ये पूर्ण झाली आहे.
Sunny Deol, the sequel to the hit film ‘Ghadar’ is coming after 20 years
SUNNY DEOL, ANIL SHARMA, ZEE: 'GADAR 2' 80% COMPLETE… #Gadar2 – the sequel to #Gadar, starring #SunnyDeol, #AmeeshaPatel and #UtkarshSharma – is 80% complete, after #Lucknow shoot… Directed by #AnilSharma… Produced by #ZeeStudios and #AnilSharmaProductions. pic.twitter.com/ypE88wzDgg
— taran adarsh (@taran_adarsh) April 25, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
‘गदर 2’ या चित्रपटाचे शूटिंग सध्या पूर्ण होत आले आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर चित्रपटाच्या टीमने आतापर्यंत जवळपास 80 टक्के शूटिंग पूर्ण केले आहे. चित्रपटाच्या उर्वरित शूटिंगचे पुढील शेड्यूल या वर्षी जूनमध्ये सुरू होणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाची काही सीन्स बाराबंकी शहरातील जिल्हा कारागृहात झाले आहे. या सीक्वेन्सच्या शूटिंगसाठी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी सरकारकडून परवानगी घेतली होती.
अमिषा पटेल आणि सनी देओल यांचा ‘गदर’ हा चित्रपट 2001मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांकडून वाहवा मिळवली होती. चित्रपटातील जबरदस्त सीन्स, संवाद आणि गाणी यांनी धुमाकूळ घातला होता. आता या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी देखील चाहते तितकेच उत्सुक आहेत.
या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकतेच उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते, जे आता पूर्ण झाले आहे. गदर 2 चित्रपटाच्या सेटवरून मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाच्या भाग 2 चे जवळपास 80 टक्के शूटिंग पूर्ण केले आहे. यासोबतच चित्रपटाच्या शूटिंगचे पुढील शेड्यूल या वर्षीच्या जून महिन्यापासून सुरू होणार असल्याचेही बोलले जात आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/528489952162072/