बार्शी : येथील खानापूर रस्त्यावरील रहिवाशी इमारतीवर दगडफेक करुन, घातक शस्त्रे नाचवित, जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार रविवारी (ता. 24) रात्री 10 वाजता हा प्रकार घडला. यात जवळपास 20- 25 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला.
याबाबत सागर भास्कर नायकोजी याने दिलेल्या फिर्यादीवरुन सुशांत पाटील, दिनेश देसाई, पवन इटकर, कालीचरण वस्ताद यांच्यासह 20 ते 25 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सागर याचा भाऊ सोनू नायकोजी यास पवन इटकर याने तुझ्यात जर दम असेल तर सुभाषनगर येथील पाण्याचे टाकीजवळ ये अशी फोनद्वारे धमकी दिली. त्यामुळे त्याचा भाऊ आकाश हा पवन इटकर यास समजाविण्यासाठी सुभाष नगर येथील पाण्याचे टाकीजवळ गेला होता. तेथे गेल्यानंतर त्यास समजावत असताना पवन इटकर सोबत असलेल्या सुशांत पाटील व दिनेश देसाई व कालीचरण वस्ताद याने मोठमोठ्याने गाडीची रेस करत तुझ्या भावाला आम्ही जिवे ठार मारणार आहोत, तुम्हाला काय करायचे ते करुन घ्या, अशी धमकी दिली.
या सर्वानी आकाशला शिवीगाळीही केली. तेवढ्यात तेथे पोलीस आल्याने ते तेथून पळून गेले. या चौघांनी नंतर नायकोजी यांच्या खानापूर रस्त्यावरील इमारतीसमोर जमावाने येवून हातात लोखंडी गज, कोयता, लाकडी दांडके नाचवित मोठमोठ्याने शिवीगाळी करत दगडफेक केली.
Crimes filed against 20 to 25 bullies in Barshi
या दगडफेकीत घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या. हातातील शस्त्रे दाखवत खाली या तुम्हा सर्वांना जिवे ठार मारतो, अशी दमबाजी करीत दहशत पसरवली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आलेल्या पोलिसांनी कालीचरण वस्ताद व दिनेश देसाई यांना ताब्यात घेतले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/528530465491354/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ रिक्षाने धडक दिल्यामुळे वृध्द जखमी
बार्शी : येथील यशवंतराव चव्हाण सभागृहासमोर रिक्षाने धडक दिल्यामुळे वृध्द जखमी झाले. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
साबीर हुसेन तांबोळी (वय 67 वर्ष, रा. मलप्पा धनशेट्टी रोड बार्शी) यांचे महात्मा गांधी शॉपिंग सेंटरच्या समोर साबिर अगरबत्ती नावाचे दुकान आहे. रात्री साडेआठ वाजण्याचे सुमारास ते दुकानातून समोर असलेल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात लघुशंका करण्यासाठी जात होते.
यावेळी रिक्षा (क्र. एमएच 13 एफ 2216 ) ही त्यांना ओव्हरटेक करुन थोडी पुढे जावून थांबली. त्यानंतर ती जवळच रिक्षा उभी करण्यासाठी पाठीमागे न पहाता चालकाने रिक्षा मागे घेतली. त्यामुळे तांबोळी जोरात ओरडले मात्र वेगाने येवून रिक्षाने त्यांना धडक दिली. त्यामुळे जोरात धक्का बसून ते खाली पडले. यावेळी रिक्षा चालकाने त्यांना मदत करण्याऐवजी पळ काढला. या अपघातात त्यांच्या पाठीस व पायास मार लागला आहे.