सोलापूर : सध्या राज्यात महाविकास आघाडीला चांगले दिवस आहेत. देगलूर आणि उत्तर कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र आल्यास विजय सहज मिळू शकतो हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता या महाआघाडीत बिघाडी होऊ नये. त्यामुळेच आता सोलापूर महापालिकेची निवडणूक दृष्टीसमोर ठेवून महेश कोठे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेतृत्व करावे आणि महापालिकेवर सत्ता आणावी असे युवासेना जिल्हा सेना प्रमुख मनीष काळजे यांनी म्हटले आहे. Where should Shiv Sena and NCP lead in municipal elections?
मनीष काळजे म्हणाले की, आगामी काही महिन्यात सोलापूर महापालिकेची निवडणूक होत आहे. निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र आल्यास महापालिकेतून भाजप हद्दपार होऊ शकते. त्यासाठी तिन्ही पक्षात समन्वयाची गरज आहे. तिन्ही पक्षांनी एकमेकांचे नेते, कार्यकर्ते फोडू नये. महेश कोठे यांनी आता शिवसेने आणि राष्ट्रवादीचे नेतृत्व करावे. महेश कोठे यांच्यात चांगले नेतृत्व गुण आहेत. त्यांनी दोन्ही पक्षाचे नेतृत्व केल्यास निश्चितच महापालिका निवडणुकीत यश मिळेल.
https://www.facebook.com/109399567404448/posts/530184051992662/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
दोन्ही पक्षाचे नेतृत्व करण्याची महेश कोठे यांच्या अंगी क्षमता आहे, आणि दोन्ही पक्षाचे नेते हे त्यांना सहकार्य करतील. एकमेकांचे नेते आणि कार्यकर्ते फोडल्यास विनाकारण पक्षांमध्ये दुही निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. याचा विचारही पक्षश्रेष्ठींनी करावा.
महाआघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देशात ज्याप्रमाणे भाजप विरोधी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र करत आहेत, त्याच प्रमाणे सोलापुरातही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील नेत्यांना एकत्र केल्यास आणि त्याचे नेतृत्व महेश कोठे यांना दिल्यास निश्चितच सोलापूर महापालिकेवर महाविकास आघाडीचा महापौर बसणार यात कोणतीही शंका नाही. या बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विचार करावा असेही जिल्हा युवासेना प्रमुख मनीष काळजे यांनी म्हटले आहे.
■ एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली
नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई आणि संपर्कप्रमुख आमदार तानाजी सावंत यांच्याशी चर्चा करून आगामी महापालिका निवडणुकीत सत्ता आणावी यासाठी नियोजन करण्याची विनंती केली आहॆ तसेच महेश कोठे आणि त्यांच्यासोबत जाणाऱ्या सर्व नगरसेवकाबाबत वरीष्ठांशी चर्चा केली आहे .असे मनीष काळजे यांनी सांगितले आहे याबाबत नामदार एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले.