मुंबई : भाजप नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. जेलमध्ये असलेल्या नवाब मलिकांचा फोटो एका सरकारी पत्रकात आल्यामुळे राणे यांनी टीका केली. काय शोकांतिका आहे हे बघून हसावं की रडावं कळत नाही. दाऊदच्या हस्तका सोबत व्यवहार प्रकरणात मलिक जेलमध्ये आहे तरीही मंत्री आहे आणि जेलमध्ये बसून मंत्री मंडळाच्या निर्णयावर महाराष्ट्र शासनाने मंत्री नवाब मलिक याचा निर्णय जाहीर केलाय, असे राणे म्हणाले.
I don’t know whether to laugh or cry Malik Rane mva भाजप नेते आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप – प्रत्यारोपाचे बाण काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. अशातच भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मविआ सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक तुरुंगात असताना त्यांचा मंत्रिमंडळ निर्णय जाहीर केल्याने निलेश राणे यांनी टीका केली आहे. मंत्रिमंडळ निर्णयाचा फोटो ट्विटरवर शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. २८ एप्रिल २०२२ रोजी हा मंत्रिमंडळ निर्णय जाहीर करण्यात आला होता. येरवडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी पदनिर्मिती करण्यास मान्यता दिल्याचा मंत्रिमंडळ निर्णय आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा फोटो आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/530255651985502/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
“काय शोकांतिका आहे. हे बघून हसावं की रडावं कळत नाही. दाऊदच्या हस्तकासोबत व्यवहार केल्या प्रकरणात नवाब मलिक जेलमध्ये आहेत. तरीही मंत्री आहे आणि जेलमध्ये बसून मंत्री मंडळाच्या निर्णयावर महाराष्ट्र शासनाने मंत्री नवाब मलिक याचा निर्णय जाहीर केलाय.” असं पोस्ट त्यांनी फोटो ट्वीट करत केली आहे.
नवाब मलिक हे महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या साथीदारांशी संबंध असलेल्या मालमत्तेच्या व्यवहाराप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मलिकला फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात असून त्यांना अजूनही जामीन मिळालेला नाही.
दरम्यान, राणे यांनी आणखी एक ट्वीट केलं, ब्रिटिश काळात स्वातंत्र्य चळवळ दडपण्याच्या उद्देशाने भारतीय दंड संहितेत समाविष्ट करण्यात आलेल्या १२४-अ या राजद्रोहाच्या आरोपाच्या कलमाचा गैरवापर होत आहे. त्यामुळे या कलमाचा गैरवापर हा कायदादुरुस्तीद्वारे थांबवायला हवा किंवा हे कलमच रद्द करायला हवे असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. यावरच भाजप नेते निलेश राणे यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे.
“पवार साहेबांनी भीमा कोरेगाव कमिशनला पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये देशद्रोह कायदा ब्रिटिश काळातला आहे, हा कायदा भारतीय नागरिकांच्या विरोधात ब्रिटिश वापरायचे म्हणून अशा कायद्याची गरज नाही असा उल्लेख त्यांनी केला आहे. पण त्यांच्याच सरकारने राणांना हाच कायदा लावला. हे पवार साहेबच करू शकतात.”, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.
काय शोकांतिका आहे… हे बघून हसावं की रडावं कळत नाही. दाऊदच्या हस्तका सोबत व्यवहार केल्या प्रकरणात नवाब मलिक जेलमध्ये आहे तरीही मंत्री आहे आणि जेलमध्ये बसून मंत्री मंडळाच्या निर्णयावर महाराष्ट्र शासनाने मंत्री नवाब मलिक याचा निर्णय जाहीर केलाय. pic.twitter.com/1G6M9c2AQK
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) April 29, 2022