सोलापूर – बार्शीतला शेअर मार्केटमधील बिगबुल नावाने ओळख असणा-या विशाल फटेने अनेक दिग्गजांना टोपी घातली. गुंतवणुकदारांना मोठ्या परताव्याचे अमिष दाखवून परतावा न देता फसवणूक व आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी मुख्य आरोपी विशाल फटेसह पाचजणांवर चौदाशे पानांचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे.
Barshi Big Bull : Fourteen hundred page indictment filed against Vishal Fate मुख्य आरोपी विशाल अंबादास फटे (वय 32 वर्षे) याचेसह वडील अंबादास गणपती फटे, भाऊ वैभव अंबादास फटे, पत्नी राधिका विशाल फटे आणि आई अलका अंबादास फटे (सर्व रा.बार्शी) यांचेविरुध्द बार्शी शहर पोलिसांनी बार्शी येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले आहे.
याप्रकरणी दीपक बाबासाहेब अंबारे (वय 37 वषे , रा.बार्शी) याने बार्शी शहर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केलेली होती. त्याने फिर्यादीत केलेल्या आरोपानुसार सन 2019 मध्ये शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवून फायदा करून देण्याचे आश्वासन दिले होते. जादा पैशाच्या त्याने विशाल फटे याचे विश्लका कन्सलंटसी प्रा.लि.,अलका शेअर सव्हिसेस,जे एम फायनान्शियल सव्हिसेस या विशाल फंटे , अंबादास फटे ,वैभव फटे ,अलका फटे यांचे नावे असलेल्या कंपनीमध्ये मोठी रकमा गुंतविली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/530285595315841/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
तो लोकांना ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवून दररोज 2 टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवित होता . विशाल फटेवर विश्वास ठेवून फिर्यादीने 96 लाख 50 हजार , त्याचा भाऊ किरण अंबारे 50 लाख , त्याचा मित्र संग्राम मोहिते याने 3 कोटी 60 लाख 20 हजार , रोहित व्हनकळस याने 35 लाख ,सुनिल जानराव याने 20 लाख , हणुमंत ननवरे याने 2 लाख असे एकूण 5 कोटी 63 लाख 25 हजार रक्कमेची गुंतवणुक केली.
परंतु आरोपीने ती परत न देता विश्वासघात व फसवणूक केली अशा आशयाची फिर्याद बाशी शहर पोलिस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेली होती.
उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांनी तपास पूर्ण करून बार्शी येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले आहे . त्यामध्ये एकूण 101 साक्षीदारांची टिपणे आहेत. दोषारोपपत्राप्रमाणे एकूण 559 गुंतवणुकदारांनी एकूण 41 कोटी 14 लाख रूपयांची फसवणूक केल्याचे नमुद केलेले आहे.
सर्व आरोपी विरुद्ध भा.द.वि. कलम 409, 420, 406, 417, 37 व महाराष्ट्र ठेविदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम 3 प्रमाणे दोषारोप पत्र दाखल करणात आलेले आहे. यात आरोपी तर्फे अँड . संतोष न्हावकर , अँड . नितीन शिंदे , अँड. वैष्णवी न्हावकर , अँड. राहुल रूपनर , अँड . शैलेशकुमार पोटफोडे तर सरकारपक्षा तर्फे अँड . बोचरे हे काम पाहत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/530255651985502/