अकलूज : कडक उन्हाची तीव्रता वाढल्याने घराबाहेर पडणे कठीण झाले असून अंगाची लाही – लाही होत आहे. अकलूज आणि परिसरात कडक उन्हामुळे दुपारचे व्यवहारही मंदावलेले दिसत आहेत. आज शुक्रवारी दुपारी अकलूज येथील शिवापूर पेठेमध्ये एका बुलेटने पेट घेतल्याने खळबळ उडाली. The heat took the bullet in Akluj
माळशिरस तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने दुपारचे घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे अनेकांची कामेही रखडताना दिसत आहेत. मागील दोन वर्षाच्या कोरोना कालावधीनंतर जनजीवन सुरळीत सुरू होत आहे. आर्थिक व्यवहार प्रगतिपथावर राहील, असा अंदाज होता. मात्र सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने लोक घराबाहेर पडत नाहीत आणि त्यामुळे व्यवहार मंदावलेला दिसत आहे.
उन्हाची तीव्रता इतकी आहे की, काही लोक चक्कर येऊन खाली पडल्याची उदाहरणे ऐकावयास मिळत आहेत. अनेक ग्रामीण भागांतील लोक हे शहरात जाऊन खरेदी विक्री करताना दिसतात. मात्र उन्हामुळे बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे अनेक जण झाडाच्या सावलीला दुपारचे विसावताना दिसत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/530351548642579/
कडक उन्हाची तीव्रता सध्या सुरू असल्याने लोक घरातच थांबणे पसंत करीत आहेत पण यातच विजेचा लपंडाव सुरू असल्याने वीज बंद झाल्यानंतर अंग घामाघूम होताना दिसत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
कडक उन्हामुळे इतर व्यवहार मंदावले असले तरी डोक्यावरील टोपी चा खप वाढलेला आहे त्याच बरोबर चश्मा खरेदीचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. कडक उन्हामुळे दुचाकी पेटण्याचे प्रमाणही वाढले असून अकलूज येथील शिवापूर पेठेमध्ये एका बुलेट ने जागीच पेट घेतला. पेट घेतलेल्या बुलेटला बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. लोकांनी ती आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
” कडक उन्हाळा सुरू आहे. लोकांनी शक्यतो बाहेर पडू नये पण जर बाहेर पडायची वेळ आलीच तर गॉगल आणि टोपीचा वापर करावा. दुपारी लहान मुलांना, वृद्धांना बाहेर पाठवू नये. पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे. सर्वांनी काळजी घ्यावी.
– डॉ संतोष खडतरे
अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन
झाडे लावा झाडे जगवा
– तहान लागल्यावर विहीर खोदणे अशी एक आपल्यात म्हण आहे. त्याप्रमाणे ऊन लागल्यानंतरच झाडांची आठवण येते. सध्याच्या कडक उन्हात एखाद्या डेरेदार वृक्षाखाली थांबल्यानंतर त्याची किंमत कळते. त्यामुळे प्रत्येकाने ही जाणीव मनात ठेवून किमान एक तरी झाड लावले पाहिजे आणि ते टिकवले पाहिजे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/530255651985502/