कोल्हापूर : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार कोसळणार अशी अनेक विधाने केली आहेत. आता त्यांनी “देवेंद्र फडणवीस वर्षभरात मुख्यमंत्री होतील”, असे भाकित केले आहे. याबाबत त्यांना प्रश्न केला असता, “याबद्दल मी फक्त आशावाद व्यक्त केला आहे. माझ्या पक्षातील नेत्याबद्दल याविषयी आशावाद व्यक्त करणे यात चुक काय?” असा प्रश्न पाटील यांनी केला आहे. ‘Devendra Fadnavis will be the Chief Minister within a year’; BJP leader’s huge optimism
चंद्रकांत पाटील यांनी सरकार फार काळ टिकणार नाही असे विधान केले होते. ‘आठवीतलं पोरगं पण सांगेल हे सरकार फार काळ टिकणार नाही. आम्हाला ते पाडण्यात रस नाही. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका योग्य पद्धतीने बजावत आहोत.’ असं पाटील म्हणाले होते.
विरोधकांनीही चंद्रकांत पाटलांची चांगलीच खिल्ली उडवली. तरीही चंद्रकांत पाटील यांचं सरकार कोसळण्याबाबतची वक्तव्ये सुरुच आहेत. आता पुन्हा एकदा पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे वक्तव्य केले. “येत्या वर्षभरात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील व त्यांच्याच हस्ते स्वामी विवेकानंद पतसंस्थेचा सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभ व अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांचा ६१ ची कार्यक्रम होईल” असे चंद्रकांत पाटील म्हणाले. सुवर्ण महोत्सव साजरा करीत असलेल्या स्वामी विवेकानंद पत संस्थेच्या वतीने उभारलेल्या श्री लक्ष्मी देवी उद्यान लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/530416361969431/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
देवेंद्र फडणवीस वर्षभरात मुख्यमंत्री होतील, असा दावाच पाटील यांनी आता केलाय. आजरा इथल्या विकास संस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. त्याबाबत पाटील यांनाच विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मी आशावाद व्यक्त केला. माझ्या पक्षाच्या नेत्याबद्दल आशावाद व्यक्त करणे यात काय चूक? असा सवालही त्यांनी केलाय.
चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीही अनेकदा महाविकास आघाडी सरकार कोसळण्याबाबत वक्तव्ये केली आहेत. इतकंच नाही तर त्यांनी त्याबाबतच्या तारखाही दिल्या होत्या. तर कोल्हापुरातून मी हरलो तर हिमालयात निघून जाईन, असं वक्तव्यही त्यांनी केलं होतं. मात्र, कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीतील नेते आणि कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत पाटलांना हिमालयात जाण्याचा खोचक सल्ला देण्यात आला. तसंच त्याबाबत अनेक विनोद आणि मिम्सही सोशल मीडियावर फिरत होते.
राजद्रोहाच्या गुन्ह्याबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत आपण सहमत असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. राजद्रोह, देशद्रोहाचा गुन्हा कशाही वेळी लावला जातो. ‘मातोश्री’च्या समोर हनुमान चालिसा म्हणण्याचा संकल्प हा राजद्रोह कसा काय होऊ शकतो? सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून हे संपवलं पाहिजे, असंही पाटील यावेळी म्हणाले.
□ मनसेसोबत युती करण्याचा प्रस्ताव ?
राज ठाकरे यांच्या सभेवरुनही चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळाली नसती तरी सभा झाली असती. राज ठाकरे यांचे अस्तित्व धोक्यात येईल असं बाळासाहेब थोरात म्हणत आहेत. त्यांनी आधी स्वत:च्या अस्तित्वाची चिंता करावी, राज ठाकरे यांची चिंता नसावी. तसंच मनसेसोबत युती करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलाय.