बार्शी : येथील प्रथितयश डॉक्टर व सुश्रुत हॉस्पिटलचे प्रमुख संजय अंधारे यांना खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देवून 30 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सचिन व संदीप चत्रभुज सुतार (दोघेही रा. जगदाळे हौसिंग सोसायटी, फुले प्लॉट, बार्शी) या दोघां बंधू विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 30 lakh ransom demanded from doctor; A case has been registered against both of them in Barshi
याप्रकरणी सुश्रुत हॉस्पिटलचे व्यवस्थापक अजित अंबऋषी अंधारे यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे. यातील आरोपी सचिन सुतार हा 2015 पासून सुश्रुत हॉस्पिटल मध्ये सीसीटीव्ही, संगणकीय व्यवस्था आदीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी नोकरीस होता. 2020 मध्ये त्याच्याविरोधात तक्रारी झाल्यामुळे त्यास दि. 28 फेब्रुवारी 2021 रोजी कामावरुन काढून टाकले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/530351548642579/
त्याचे वडिल आणि डॉ. अंधारे यांचे वडील मित्र असल्यामुळे त्याच्या वडिलांनी रदबदली केल्यामुळे त्यास माफ करुन पुन्हा कामास घेतले. त्यानंतर त्याची आई आशा सुतार या कोरोनावरील उपचार घेण्यासाठी दवाखान्यात दाखल झाल्या. उपचार चालू असताना त्या दि. 1 मे 2021 रोजी मयत झाल्या. या घटनेनंतर एक महिन्यानंतर सचिनचा भाऊ संदीप सुतार याने डॉ. अंधारे आणि हॉस्पिटल प्रशासनाविरोधात सोशल मिडियावर बदनामी करण्यास सुरुवात केली.
पोलिस प्रशासनाकडे अनेक तक्रारी केल्या. त्याची चौकशी होवून त्यात तथ्य न आढळल्याने केस निकाली काढण्यात आल्या. त्यानंतरही दोघे बंधू बदनामी करत असल्यामुळे डॉ. अंधारे यांनी त्यांच्याविरोधात स्थानिक न्यायालयात मानहानीची भरपाई मिळावी म्हणून दावा दाखल केला आहे. तसेच अजित अंधारे याने सचिन सुतार याने हॉस्पिटलमधील संगणकीय रेकॉर्ड चोरल्याप्रकरणी त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केलेली आहे. त्यामुळे ते दोघे त्यांच्यावर चिडून होते.
त्यामुळे दुपारी 3 वाजता अजित अंधारे हे जेवण करुन घराकडून दवाखान्यात येत असताना त्यांना अडवून सुतार बंधूंनी तू आमच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करतो काय? डॉ. अंधारे यांना कोर्टातील दावा मागे घ्यायला सांग. दोन दिवसात 30 लाख रुपये द्यायला सांग, नाहीतर आईला ठार मारले म्हणून त्यांच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करुन तुम्हांला आयुष्यभर जेल मध्ये सडवू, हॉस्पिटलमधले आमच्याकडे असलेले सर्व रेकॉर्डस सार्वजनिक करुन हॉस्पिटलची बदनामी करु. पेशंट भडकावून जाळपोळ घडवून आणू, आमरण उपोषण, आत्मदहन करायला लावू, अशी दमबाजी करीत शिवीगाळ करुन मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/530416361969431/