औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे ला औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. याच पार्श्वभुमीवर एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांना प्रसार माध्यमांद्वारे इफ्तार पार्टीचे आमंत्रण दिले आहे. “तुमची ही सभा रात्री 8 वाजता सुरु होईल, त्याआधी तुम्ही आमच्यासोबत इफ्तार करण्यासाठी यावं, सर्व हिंदू-मुस्लिम भाऊ एकसोबत बसून इफ्तार केल्यास समाजात एक चांगला संदेश जाईल.” असे जलील म्हणाले. Raj Thackeray invited to Iftar party in Aurangabad
आज औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांची भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जलील म्हणाले, दोन वर्ष कोरोनामुळे सणावर परिणाम झाला आहे. ९९ टक्के लोक शांतता प्रिय असतात. लहान-मोठे व्यापारी सर्व जातीधर्मातील लोक आहेत. त्यांना भीती आहे. सभेमुळे काही अनुचित प्रकार घडेल. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस सतर्क झाले आहेत.
इम्तियाज जलील यांनी इफ्तार पार्टीचे निमंत्रण देताना, “राज ठाकरे यांची औरंगाबादच्या मराठावाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा आहे. साडे सात वाजता तुमची सभा आहे, त्या सभेपूर्वी हिंदू मुस्लीम एकतेसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे. हिंदू मुस्लीम एकत्र येऊन इफ्तार करु” असे आवाहन राज ठाकरे यांना केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/530501818627552/
पोलिस विभागाला विश्वास द्यायला आलो होतो की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मी खासदार म्हणून दिवाळीचा फराळ खायला जातो. मी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देतो, की त्यांनी ईदच्या दिवशी ईदग्याजवळ यावे आणि एकमेकांना शुभेच्छा द्यावेत, असे आवाहन त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना केले आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या अजेंड्यानुसार काम करतो. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की एकता शहरात टिकून राहावी. आम्ही धर्म व जातीविरोधात बोललो नाहीत. कायद्यापुढे कोणीही मोठे नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने जे निकाल (भोंग्यांबाबत) दिले आहे. त्याचे पालन करण्यासाठी एजन्सींची नियुक्त केली पाहिजे, असे ते म्हणाले.
“औरंगाबादच्या जनतेनं कोणतीही भीती बाळगू नये. एका राजकीय पक्षाचे नेते येत आहेत, त्यामुळं चिंता करु नका. बाजार पेठेतील दुकानदारांना त्यांच्या मालाचं काय होणार ही चिंता लागली आहे. राज ठाकरे हे आमचे पाहुणे आहेत. ते आम्ही दुश्मन नाहीत. त्यांनी यावं सोबत इफ्तार करावं आणि सभेत जाऊन त्यांना जे बोलायचं आहे ते बोलावं” असेही जलील यांनी म्हणले आहे.
“राज ठाकरे यांच्या सभेनंतर आणखी लोक येतील मात्र औरंगाबादमधील एकता आणि शांतता अबाधित राहावी. आमच्या सभेत आम्ही कोणत्याही धर्माविरोधात बोलणार नाही” असे आवाहन जलील यांनी जनतेला केले आहे. अद्याप जलील यांच्या निमंत्रणावर राज ठाकरे यांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
https://www.facebook.com/109399567404448/posts/530416361969431/