अहमदनगर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबादला जात असताना अहमदनगरच्या घोडेगाव नजीक 3 गाड्या एकमेकांना धडकल्या आहे. या गाड्यांमध्ये अभिनेते अंकुश चौधरी आणि केदार शिंदे यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. Accident of vehicles in Raj Thackeray’s convoy
30 ते 40 गाड्यांचा ताफा घेऊन राज ठाकरे औरंगाबादकडे येत होते. मागील बाजूला असलेल्या तीन गाड्या एकमेकांना धडकल्या. यामध्ये कोणीही जखमी नाही. अभिनेते केदार शिंदे, आणि अंकुश चौधरी या वाहनांतून प्रवास करीत होते. त्यांच्या गाडीच्या बोनेटचे किरकोळ नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. समोरच्या गाड्यांनी ब्रेक मारल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या गाडी एकमेकांवर आदळल्या. राज ठाकरेंच्या गाडीसह अनेक गाड्या पुढे होत्या, तर काही गाड्या पाठीमागून येत होत्या. ताफा न थांबता औरंगाबादकडे रवाना झाला आहे. गाड्या एकमेकांवर आदळल्याने गाड्यांचे मोठे नुकसान झाले. यात दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेते अंकुश चौधरी यांच्या गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/530983025246098/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या म्हणजेच 1 मे रोजी औरंगाबादमध्ये भव्य सभा होणार आहे. आज सकाळी पुण्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे औरंगाबादकडे निघाले. त्यांच्यासोबत 30 ते 40 गाड्यांच्या ताफा आहे. या ताफ्यात दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेते अंकुश चौधरी यांच्या गाड्यांचाही समावेश आहे. दरम्यान, अंकुश चौधरी आणि केदार शिंदे सुखरूप असून, त्यांच्या मर्सिडीज गाडीचे नुकसान झाले आहे. काळजी करण्याचं कारण नसल्याचे अंकुशने माध्यमांना बोलताना सांगितले.
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविरोधात भूमिका घेतली होती. राज्य सरकारला 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरावेत, असा अल्टीमेटम राज ठाकरेंनी दिला होता. त्यातच आता दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतो, असं म्हणत राज ठाकरेंच्या सभेविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. ती याचिका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे नमूद करत फेटाळून लावली.
दरम्यान, नगरध्ये राज ठाकरे यांच्या वाहनांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी जय श्रीराम अशी घोषणा दिल्या. ताफा चौकात आला त्यावेळी खांबावर आधीच बसविण्यात आलेल्या भोंग्यावरून हनुमान चालिसा लावण्यात आली होती.