सोलापूर : स्थानिक नेत्यांनी स्वतःच्या बँका आणि कारखाने नीट चालवा. प्रत्येक ठिकाणी शरद पवार व अजित पवार येणार नाहीत. मी माझे कारखाने आणि बँका चांगल्या पद्धतीने चालवतोय. मुख्यमंत्र्यांच्या सोबतीने राज्याच्या हिताचे निर्णय घेत आहोत, बँका आणि कारखाने चांगले चालवण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. Solapur: Banks, run factories properly, Pawar will not come everywhere – Ajit Pawar
सोलापूर जिल्ह्यात अनगर नगरपंचायतीच्या स्थापनेनिमित्त कृतज्ञता व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. सामाजिक न्याय मंत्री
धनंजय मुंडे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी आमदार राजन पाटील, र जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, आमदार बबनराव शिंदे, आमदार यशवंत माने, आमदार निलेश लंके, आमदार संजय शिंदे, आमदार अमरसिंह पंडीत, आमदार राहुल पाटील, प्रदेश उपाध्यक्ष दीपक सांळुखे पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील, पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील आदींची उपस्थिती होती.
यावेळी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर त्यांनी यावेळी टीका केली. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही भाषणात समाचार घेतला. राज ठाकरेंना भाजपाचा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे, हे सगळ्यांना समजत आहे. त्यामुळे वातावरण गढूळ करण्याचे काम हाणून पाडा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
अजित पवार म्हणाले, ज्यांना 14 आमदार, नाशिक महापालिका टिकवता अली नाही अशी व्यक्ती शाहू, फुले, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये वातावरण गढूळ करण्याचं काम करतायत. ज्यांना जे आरक्षण मिळालेलं आहे ते त्यांनाच राहिलं. पण, इतरांच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देता येईल. ते देण्याचा काम आम्ही करणारं आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
”रवी राणा आणि नवनीत राणा यांना मागच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनेच पुरस्कृत केलं होतं. त्यामुळे ते निवडून आले. आता ते हनुमान चालिसाचा मुद्दा घेऊन निघाले आहेत. हनुमान चालीसा म्हणायला मातोश्रीसमोर कशाला जाता. तुमचे घर तुम्हाला कमी पडायला लागले का,” असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
https://www.facebook.com/109399567404448/posts/530902108587523/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सोलापूर जिल्ह्यात अनगर नगरपंचायतीच्या स्थापनेनिमित्त कृतज्ञता व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, आपण दोन तारखेला गुढी पाडवा साजरा केला, रमजानच्या मुस्लिम बांधवांना आपण शुभेच्छा देतोय. बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती, महावीर जयंती, बसवेश्वर जयंती साजरी केली. सगळं नीट चालू असताना भोंगा आणि हनुमान चालीसाचा विषय काढला आहे.
अजित पवार म्हणाले, त्या रवी राणा आणि नवनीत राणांना राष्ट्रवादी काँग्रेसनेच मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी पुरस्कृत केलं होतं. ते निवडूनही आले. तुम्हाला हनुमान चालीसा म्हणायला तुमचं घर कमी पडत होत का, असा टोला लगावून ते म्हणाले, मातोश्री समोर कशाला जाता. तुमचे घर तुम्हाला कमी पडायला लागले का. आम्हाला हनुमान चालीसा म्हणायचा असेल तर आम्ही आमच्या घरात म्हणेन. सर्वोच्च न्यायालयाने सकाळी सहा ते रात्री दहा लाऊडस्पीकरला परवानगी दिली आहे.
उद्या जर कुठलाही निर्णय घ्यायचा झालंच तर फक्त मस्जिदवरचे भोंगे बंद होणार नाहीत. तर प्रवचन, कीर्तन, हरिनाम सप्ताह असतो, साईबाबांची आरती असते, वाघ्या मुरलीचे कार्यक्रम चालु असतात, नियम लावायला गेला तर त्यावरही या निर्णयाचा परिणाम होईल. मथुरेला लाऊडस्पीकर बंद करण्याचा निर्णय घेतलाय, असे उदाहरण देऊन अजित पवार म्हणाले, सर्वांच्या संमत्तीने निर्णय होत असतील तर नको ती भूमिका घेण्याचे कारण काय. आता जे नेते सांगत आहेत, त्यांचे काय खरे आहे का.
आता कोणत्याच निवडणुका नाहीत. काय चमत्कार झालाय कोणास ठाऊक आता ते भाजपला पाठींबा आणि आम्हाला विरोध करत आहेत. जनतेला जे पाहिजे ते सर्वांना देण्याची आमची तयारी आहे. पण, ज्यामुळे कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार आहे, जाती धर्मात तेढ निर्माण होणार आहे, त्या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत. या प्रश्नावर आम्ही सर्व राजकिय पक्षांची बैठक बोलावली होती. पण मनसे सोडले तर सगळ्यांनी हे सर्व होतय ते बरोबर नाही, असे सांगितले होते.
□ एक टिपरुही शिल्लक राहणार
शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आल्याशिवाय सुबकता येणार नाही. हे माहिती आहे. म्हणूनच त्यादृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. ऊसाचे संकट सगळ्यांसमोर आहे. म्हणूनच 1 मेपासून जे कारखाने शेतकऱ्यांचा ऊस आणतील, त्यांना टनाला 200 रुपये देण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळात घेतला आहे. 50 किमीच्या पुढे प्रती 5 रुपयेदेखील कारखान्यांना रिकव्हरी देणार, असे अजित पवार म्हणाले. सोलापूर जिल्ह्यातील ऊसाचा एक टिपरुही शिल्लक राहणार नाही, असेही ते म्हणाले.
राज्यात सध्या ऊसाचे मोठं संकट उभे असून आम्ही शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. एक मे नंतर जे कारखाने ऊस आणतील त्यांना टनाला दोनशे रूपये रिकव्हरी लॉस देण्याचा निर्णय घेतला आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/530910298586704/