● जबरदस्तीने लग्न केल्यानंतर पतीकडून दुष्कर्म
सोलापूर – एका अल्पवयीन मुलीला स्वतःच्या आईने वेश्याव्यवसायात ढकलले. त्यानंतर तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिल्यानंतर पतीने तिच्यावर दुष्कर्म केल्याची घटना सोलापुरात घडली आहे. Birth mother pushes underage girl into prostitution, marries immoral man
याबाबत १४ वर्षांच्या पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन तिची आई, सासू व पतीविरुध्द पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलगी आई, वडील व लहान बहिणीसह पुण्यात राहत होती, परंतु आई ही वडिलांना सोडून दोन मुलींसह सोलापुरात राहण्यास आली. येथे राहत असताना आईचे एका पुरुषाबरोबर प्रेमसंबंध जुळले व तोही त्यांच्याच घरात राहू लागला. परंतु, मुलीला व बहिणीला हे आवडत नव्हते. त्यामुळे आईने मोठ्या मुलीला बार्शी येथील तिच्या मैत्रिणीकडे पाठविले. तिथे ती वेश्याव्यवसायात अडकली.
आईने तिला फोन करुन तू तिथेच राहा, पळून जाण्याचा प्रयत्न केला तर ते लोक तुला मारुन टाकतील अशी धमकी दिली. त्यामुळे ती तेथेच राहिली. परंतु सोलापुरातील एक मुलगा तिच्याकडे आल्यानंतर त्याने तिची सुटका करुन तिला आपल्या घरी नेले. त्या मुलाच्या आईवडिलांनी मुलगी अल्पवयीन असल्याने तोपर्यंत तू आईकडे राहा, नंतर तुझे लग्न करुन देऊ असे सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/530523611958706/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
परंतु मुलीने आईकडे जाण्यास नकार दिला. परंतु काही दिवसांनी मुलीची आई त्या मुलाच्या घरासमोरुन जात असताना तिने मुलीला पाहिले. तेव्हा आईने तिला एक दिवस मुलीला नेऊन पुन्हा आणून सोडते, अशी थाप मारुन तिने मुलीला नेले.
मुलीला आईने ती ज्याच्यासोबत राहत त्या पुरुषाच्या गावी नेले. वेश्याव्यवसायातून सोडवलेल्या मुलाशी लग्न करणार असल्याचे मुलगी सांगत असतानाही तिचे त्याच्याशी लग्न न करता आईचे ज्याच्याशी अनैतिक संबंध होते त्याच पुरुषाशी मुलीचे जबरदस्तीने लग्न लावून दिले. मुलगी अल्पवयीन असताना पतीने तिच्यावर जबरदस्तीने दुष्कर्म केले. लग्नानंतर पतीने तिला अनेकवेळा मारहाण केली. त्यामुळे तिने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु रस्ता माहीत नसल्याने ती पोलिसांपर्यंत पोहोचली नाही. त्याने तिला अकलूज येथे नेऊन भाड्याच्या खोलीत ठेवले.
पती कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर ती एसटीबसने सोलापूरला आली व तिने पोलिसांशी संपर्क साधला. याप्रकरणी विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा गुन्हा बार्शी पोलिसात वर्ग करण्यात आला आहे.