सोलापूर : सोलापूर शहर – ग्रामीण पोलीस दलातील १७ पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहेत. उद्या रविवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पदक प्रदान केले जाणार आहे. Solapur city – Director General of Police Medal announced to 17 police personnel officers in rural police force
सोलापूर शहर ग्रामीण पोलीस आस्थापनेवर उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या पोलीस दलातील सतरा अधिकारी कर्मचारी यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह पदक जाहीर झाले.असून याची घोषणा गृहविभागाने १ मे च्या पूर्वसंध्येला एका पत्रकान्वये केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/531037801907287/
राज्यभरातील ८०० पोलीस अधिकारी कर्मचारी यापैकी १७ कर्मचारी अधिकारी हे सोलापुरातील आहेत. १ मे रोजी सकाळी ८.३० वाजता पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते तसेच पोलीस आयुक्त हरीश बैजल ,पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, शहर पोलीस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर,डॉक्टर दिपाली घाटे यांच्या उपस्थितीत हा पदक पुरस्कार सोहळा होणार आहे.
● पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकारी कर्मचारी या प्रमाणे
》 पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर
प्रिती प्रकाश टिपरे, सहा.पोलीस आयुक्त गुन्हेशाखा, सोलापूर शहर
डॉ. संतोष बापूराव गायकवाड, (सहा पोलीस आयुक्त, नेम विभाग १,सोलापूर शहर). हिंदूराव अंबादास पोळ, ( पोलीस हवालदार/ ११४५, पोलीस मुख्यालय, सोलापूर शहर) नवनीत घाळेप्पा नडगेरी, (पोलीस हवालदारगुन्हेशाखा, सोलापूर शहर)
दिपक गुलाबराव घाडगे, (पोलीस नाईक, सोलापूर शहर) अल्फान शादुल्ला सय्यद, (पोलीस नाईक पोलीस मुख्यालय, सोलापूर शहर)
अभिनित सदाशिव कोष्टी, पोलीस नाईक (अन्टीकरप्शन विभाग, सोलापूर) सिध्दाराम लक्ष्मण गवळी,( गुप्त वार्ता अधिकारी, सोलापूर)
》 ग्रामीण पोलीस
अरुण ज्ञानदेव फुगे, (पोलीस निरीक्षक सोलापूर, तालुका पोलीस ठाणे)
धनंजय चित्तरंजन पोरे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा)अब्दुल हमीद याकुब शेख (पोलीस उपनिरीक्षक नेमणूक) नागेश तुकाराम गायकवाड (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक)
नीलकंठ भालचंद्र जाधवर (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नेमणूक – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा)
संजय विठोबा कवचाळे (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक) मोहन शामकर्ण मनसावले (पोलीस हवलदार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा)
सलीम हुसेन बागवान( पोलीस हवालदार)
संतोष विश्वनाथ म्हेत्रे (पोलीस हवालदार )