औरंगाबाद : AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या वादावर बोलायला नकार दिला आहे. दोघा भावांच्या भांडणात काही जण माझं नाव घेत आहे. पण मला सांगायचंय, त्यांनी बसून सामोपचाराने भांडणं सोडवली पाहिजेत, उगीच माझं नाव मध्ये घेऊ नये, असा सल्ला एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेनेला दिला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना हिंदू ओवेसी असे संबोधले होते. Don’t get me wrong? – AIMIM Asaduddin Owaisi
औरंगाबादचे AIMIM खासदार इम्तियाज जलील यांच्या इफ्तार पार्टीत पोहोचलेल्या असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी भारतीय जनता पक्षावर देशातील मुस्लिमांविरोधात द्वेष निर्माण केल्याचा आरोप केला. हैदराबादचे खासदार म्हणाले की, भाजप सरकारने मुस्लिमांविरुद्ध युद्ध पुकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे द्वेषाच्या घटना थांबवाव्यात, अशी मागणी करून ते म्हणाले की, यामुळे देश कमकुवत होत आहे.
एआयएमआयएमचे अध्यक्ष म्हणाले, “आपल्या देशात भाजपने मुस्लिमांविरोधात द्वेषाचे वातावरण निर्माण केले आहे. मुस्लिमांनी संयम आणि धैर्य गमावू नये आणि संविधानात राहून या अत्याचाराशी लढा द्यावा. भाजपला मुस्लिमांवर इतका दबाव आणायचा आहे आणि त्यांना दुखवायचे आहे जेणेकरून ते शेवटी शस्त्र उचलतील. आम्ही पंतप्रधानांना हा द्वेष थांबवायला सांगू इच्छितो. त्यामुळे देश कमकुवत होत आहे. तुमचा पक्ष आणि तुमच्या सरकारने भारतीय मुस्लिमांविरुद्ध युद्ध घोषित केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींमध्ये लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत त्यांना ‘हिंदू ओवेसी’ म्हणून संबोधत आहेत.
हैदराबादचे खासदार आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (MIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी संजय राऊत यांनी राज ठाकरेंसाठी ठेवलेल्या या नावावर आक्षेप घेतला आहे. संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, ठाकरे कुटुंबातील आपसी भांडणात माझे नाव ओढू नका. हैदराबादचे खासदार संजय राऊत यांनी मला त्यांच्या भांडणात ओढू नये, असे म्हटले आहे. राज ठाकरेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनी माझे नाव ‘हिंदू ओवेसी’ घेऊ नये. हा ठाकरे कुटुंबातील कलह आहे. त्यांनी एकत्र बसून ते सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
उल्लेखनीय आहे की, भारतीय जनता पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचा वापर मुस्लिम मतांमध्ये फूट पाडण्यासाठी आणि आता ‘शिवसेनेच्या हिंदुत्वावर’ हल्ला करण्यासाठी करत असल्याचे काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यांनी राज ठाकरे यांचे नाव घेतले नसून, त्यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही टीका केली.
दरम्यान, देशात समान नागरी कायदा आणण्याची चर्चा सुरू असतानाच अनेकांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. काल भारतीय मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने पंतप्रधान मोदींना पत्र लिहून सर्व धर्मगुरूंना सामावून घेऊन मसुद्यावर चर्चा करावी, जेणेकरून एकमत होऊ शकेल अशी विनंती केली होती.
त्याचवेळी आज AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी याला विरोध केला आहे. ओवेसी म्हणाले की, देशाला समान नागरी संहितेची गरज नाही, कारण कायदा आयोगाने त्याची गरज नसल्याचे आधीच सांगितले आहे. सरकारने महागाई आणि बेरोजगारीची चिंता करावी असेही ते यावेळी म्हणाले.
● हुतात्मा चौकात येऊन राजकीय बोलणं हे दुर्दैवी – देवेंद्र फडणवीस
विरोधीपक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन केले. माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे हुतात्मा स्मारकावर येऊन देखील काही राजकारणी केवळ राजकारणावरच बोलत असल्याने त्यांच्यावर फडणवीसांनी निशाणा साधत, आम्ही या ठिकाणी कुठलही राजकीय भाष्य करणार नसल्याचं सांगितलं.