■ आता सुशीलकुमारांनी निवांत बसावे : उज्ज्वला शिंदे
सोलापूर : मी कधीही जी – 23 किंवा आणखी कोणत्याही ग्रुपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला नाही. गांधी कुटुंबाविषयी लोकांच्या मनात वेड आहे. गरीब माणसांच्या मनात त्यांच्याबद्दल खूप प्रेम आहे. पुन्हा सगळ्यांनी एकत्र येऊन काँग्रेस उभी केली पाहिजे, काँग्रेसचा बेस हा गरीब माणूस आहे. तर दुसरा सर्वधर्म समभाव हा आहे. या सर्वांना सोबत घेऊन काम केले पाहिजे, असे प्रतिपादन माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. Sushilkumar Shinde told how a man falls in friendship
एका खासगी वाहिनीला मुलाखत देताना सुशीलकुमार शिंदे आणि उज्वला शिंदे या बोलत होत्या. यावेळी शिंदे
यांनी विविध मुद्यांना हात घातला. ते म्हणाले, शरद पवार मुख्यमंत्री होते, त्यावेळी काही लोकांनी त्यांच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एक पत्र दिल्लीला दिले होते. त्यावेळी ते पत्र घेऊन विलासराव देशमुख माझ्याकडे आले होते. त्यावेळी विलासराव मला म्हणाले की, या पत्रावर सही करा. मी न वाचताच मी त्यावर सही केली. त्यानंतर मला कळाले की त्या पत्रामध्ये पवार यांना मुख्यमंत्री पदावरून काढावे अशी मागणी करण्यात आली होती.
त्यावेळी मी महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष होतो. मैत्रीत माणूस कसा फसतो याचा त्यावेळी मला अनुभव आला. पण त्यावेळी माझी चूक झाल्याचे त्यांनी सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/531384441872623/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
इंदिरा गांधी या टिका करणाऱ्याचे एकूण घेत होत्या. अनेकांनी जरी त्यांच्याकडे तक्रारी केल्या तरी त्याच्या खोलात जाऊन त्या चौकशी करत होत्या. नागपूरला मी सावरकरांच्या पुतळ्याचे उद्घाटन करायला गेलो होतो. त्यावेळी एका खासदाराने इंदिरा गांधी यांच्याकडे माझी तक्रार केली होती. काँग्रेसचा मंत्री सावरकरांच्या पुतळ्याचे उद्घाटन करायला गेल्याचे इंदिरा गांधींना सांगितले होते. ही आठवण शिंदे यांनी सांगितली.
पोलीस अधिकारी म्हणून मला खूप पुढे जाण्याची इच्छा होती, असेही सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
□ आता सुशीलकुमारांनी निवांत बसावे : उज्ज्वला शिंदे
सुशिलकुमार शिंदे यांचा स्वभाव मवाळ आहे, त्यांनी कधी आक्रमक भूमिका घेतली नाही. ते पदासाठी कधीही आग्रही नसतात. आता त्यांनी थोडेसे निवांत बसावे. त्यांनी राजकारणात जास्त पुढाकार घेऊ नये, असे मला वाटते, असे उज्वला शिंदे म्हणाल्या. घरामध्ये लक्ष देण्याचे त्यांना आणखी जमत नाही, आता ते कुटुंबाच्या जवळ आले आहेत. ज्यावेळी त्यांना दोन वेळा मुख्यमंत्रीपदाची संधी आली पण ते झाले नाहीत. त्यावेळी त्यांनी पक्षातील नेत्यांना बोलावे असे मला वाटत होते, असेही उज्वला शिंदे म्हणाल्या.
https://www.facebook.com/109399567404448/posts/531367435207657/