□ धुडघूस घालण्यासाठी अक्कल लागत नाही
मुंबई : मशिदीवरील भोंगे हटवा. नाहीतर मी 4 में नंतर ऐकणार नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. “महाराष्ट्रात काम करत असताना कोणीही असं अल्टिमेटम देऊ शकत नाही. हे कायद्याचं राज्य आहे. इथे कोणाचीही हुकुमशाही चालणार नाही. जर कोणाला असं वाटत असेल की मी असं म्हटलं तर तसं होईल तर ते चालणार नाही. मग अजित पवारनेही हुकुमशाही केलेली चालणार नाही,” असे अजित पवार म्हणाले. Dictatorship will not work in Maharashtra; Ajit Pawar’s reply to Raj Thackeray
राज ठाकरे यांनी काल औरंगाबाद येथे केलेले भाषण म्हणजे मागील भाषणाचेच रिपीटेशन आहे. देशातील हिंदु बांधवांना विनंती आहे, मागचं पुढचं काय बघू नका, हे भोंगे उतरले गेलेच पाहिजेत, सगळ्या धार्मिक स्थळांवरचे. अभी नही तो कभी नाही, हिंदु बांधवांना विनंती आहे, तीन तारखेपर्यंत हे ऐकले नाहीत तर चार तारखेला सगळीकडे हनुमान चालिसा ऐकू आलीच पाहिजे असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. याला उद्देशून अजित पवार यांनी उत्तर दिले. येथे कायद्याचे राज्य आहे. राज्य घटना, कायदे, नियम सर्वांना सारखे आहेत. त्यामुळे भोंग्याबाबत कोणतीही हुकुमशाही चालणार नाही असा इशारा अजित पवार यांनी राज ठाकरे यांना दिला.
नाशिकमध्ये कृषी विभागातर्फे आज (दि.2) राज्यस्तरीय कृषी पुरस्कार सोहळा पार पडला. राज्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकरी व अधिकारी यांना विविध पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. सोहळ्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांच्या औरंगाबाद येथील भाषणाचा चांगलाच समाचार घेतला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
कारण नसताना पवार साहेबांचे नाव घ्यायचे आणि प्रसिद्धी मिळवून घ्यायची असे झाले आहे. पवार साहेबांवर काही बोलले म्हणजे प्रसिद्धी मिळते म्हणून काहीजण विनाकारण नको ते बोलतात. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस कारवाई करतील, असा थेट इशारा अजित पवार यांनी राज ठाकरे यांना यावेळी दिला.
□ धुडघूस घालण्यासाठी अक्कल लागत नाही
लोकांच्या मनात जे विष कालवत आहेत त्यांनी एखादी संस्था, एखादा कारखाना उभा केला आहे का? असा प्रश्न विचारत, संसार उभा करण्यासाठी अक्कल लागते, धुडघूस घालण्यासाठी अक्कल लागत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे.
नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शिवसृष्टीचे येवला शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजन कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली.
दरम्यान, यास सोलापुरातील एका कार्यक्रमात पवारांनी उत्तर दिले आहे. राज ठाकरे यांनी दावा केलाय उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवले गेले, उत्तर प्रदेशमध्ये फक्त मशिदीवरचे भोंगे उतरवले गेले नाहीत. तिथे अयोध्येला की मथुरेला पहाटेचा लाऊडस्पीकरल लागयचा, तोही बंद झाला आहे. काही जरी निर्णय झाला तरी तो सर्वांवर बंधनकारक राहील, फक्त मशिदींवरचे भोंगे काढायचे, इतर ठिकाणचे काढले जाणार नाही, असं कसं होईल असं अजित पवार यांनी सोलापुरात म्हटले होते.