सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मिटकलवाडी (ता. माढा ) येथे धक्कादायक घटना घडली आहे. एका विहीरीत एका विवाहितेचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. सासरकडून विवाहितेचा छळ होत होता. त्यांनीच तिची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकला आहे, असा आरोप मुलीच्या माहेरच्या कुटुंबाने केला आहे. माहेरकडील संतप्त झालेल्या कुटुंबाने सासरच्या घरापुढे मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीसांत तक्रार दिली आहे. Solapur: Maher cremated her daughter’s body in front of her father-in-law’s house
रविवारी (ता. 1) टेंभुर्णी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. अंजली हनुमंत सुरवसे, असं मृत विवाहितेचं नाव आहे. तिचा 2016 मध्ये हनुमंतसोबत विवाह झाला होता. अंजली मूळची पंढरपूर तालुक्यातील उंबर पागे गावची होती. तिचं लग्न मिटकल वाडीतील हनुमंतशी लावण्यात आलं होतं. लग्नच्या सहा वर्षांनंतर अंजलीच्या मृत्यूनं तिच्या माहेरच्यांना मोठा धक्का बसला आहे.
या घटनेप्रकरणी खुनाचा गुन्हा पोलिसांनी दाखल न केल्याने संतप्त नातेवाईकांनी मुलीचे सासर असलेल्या माढ्याच्या मिटकलवाडीतील घरासमोरच विवाहित मुलीच्या मृतदेहाचे दहन करुन आपला रोष व्यक्त केलाय. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
अंजलीचा विहिरीत मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली. या विवाहितेची तिच्या सासरकडच्यांनी हत्या केली आणि मग तिचा मृतदेह विहिरीत टाकला, असा खळबळजनक आरोप कुटुंबीयांनी केलाय. सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा सतत छळ सुरु होता, असा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सासरच्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृत विवाहितेच्या संतप्त नातेवाईकांनी केली आहे.
अंजलीचा छळ नेमका कोणत्या कारणासाठी केला जात होता, याची माहिती मिळू शकलेली नाही. या सगळ्याला कंटाळून निराश झालेल्या अंजलीनं आपलं आयुष्य संपवलं. विहिरीत उडी घेऊन तिनं आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी सांगितल जातंय.
आता सासरच्या मंडळींवर अंजलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 306 कलमानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
● शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, उद्यापासून उन्हाळी सुट्टी सुरु
#holiday
#surajyadigital #school #सुराज्यडिजिटल #summer #students #GoodNews #आनंद #बातमी
संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता आणि सुसंगती आणण्यासाठी सन 2022 ची उन्हाळी सुट्टी आणि आगामी शैक्षणिक वर्ष 2022-23 संदर्भात शालेय शिक्षण विभागाने महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. यानुसार विद्यार्थ्यांना 2 मेपासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय घेतला आहे.