पुणे : राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा उपस्थित करताच मनसेतील अनेक मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. मात्र नुकतेच कालच्या सभेतील भाषण आणि सभेत चालू झालेल्या अजानावर राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेमुळे आणखी तणाव वाढला आहे. यातूनच 16 वर्षे विविध पदावर काम करणा-या एका मनसैनिकाने राजीनामा दिलाय. Resignation of MNS mayor in Daund; Decided why he worked for 16 years
औरंगाबाद या ठिकाणी झालेल्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर 16 वर्षांपासून पक्षात कार्यरत असलेले दौंड शहरातील मनसेचे शहराध्यक्ष जमीर सय्यद यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा मनसेचे राज्य उपाध्यक्ष सुधीर पाटसकर यांच्याकडे सोपवला आहे. जमीर सय्यद हे गेल्या तीन वर्षांपासून मनसेचे शहराध्यक्ष पदावर कार्यरत होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मशिदींवरील भोंगे काढण्याची मागणी व त्यानंतर औरंगाबाद येथे केलेल्या विधानावर नाराजी व्यक्त करीत पुणे जिल्ह्यातील दौंडचे मनसे शहराध्यक्ष जमीर काझी यांनी राजीनामा दिला आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/532388765105524/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सुधीर पाटसकर यांच्याकडे जमीर सय्यद यांनी राजीनामा सादर केला आहे. राजसाहेब ठाकरे यांची भोंगे संबंधी भुमिका चुकीची असल्याचे सांगत जे पूर्वीपासून चालू आहे ते चालू राहिले पाहिजे. महाराष्ट्र दिनी (ता. १ मे) औरंगाबाद येथे राज ठाकरे यांनी अजान सुरू असताना केलेले विधान मुस्लिम समाजाची भावना दुखावणारे आहे. समाजातील ज्येष्ठांसह सर्वांबरोबर चर्चा केल्यानंतर आणि समाजाकडून दबाव वाढल्याने राजीनामा दिल्याचे जमीर सय्यद यांनी सांगितले.
□ चर्चा आणि समाजाकडून दबाव
समाजातील ज्येष्ठांसह सर्वांबरोबर चर्चा केल्यानंतर आणि समाजाकडून दबाव वाढल्याने राजीनामा दिल्याचे जमीर सय्यद यांनी सांगितले. सलग १६ वर्षे मनसे मध्ये सक्रिय असलेले जमीर सय्यद यांनी मनसे वाहतूक सेनेचे शहराध्यक्षपद, मनसे एसटी कामगार सेनेचे पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून काम पाहिले आहे.
जमीर सय्यद यांनी मनसे वाहतूक सेनेचे शहराध्यक्षपद, मनसे एसटी कामगार सेनेचे पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून काम पाहिले आहे. मागील तीन वर्षांपासून जमीर सय्यद हे दौंडचे शहराध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.
मागील ३ वर्षांपासून जमीर सय्यद दौंड शहराध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. जमीर सय्यद यांचे बंधू दहा वर्षे दौंड नगरपालिकेचे सदस्य होते. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सुधीर पाटसकर यांनी सदर राजीनामा मिळाला नसल्याचे सांगितले. सामाजिक बहिष्काराच्या भीतीने राजीनामे दिले जात असल्याचे मत अॅड. सुधीर पाटसकर यांनी व्यक्त केले. जे मुस्लिमधार्जिणे लोक आहेत, त्यांचाच भोंगा आता फार वाढला आहे. मुस्लीम समाज हा जुन्या रूढी-चालीरीती व कालबाह्य परंपरेबद्दल बोलायला कचरतो, असेही विधान पाटसकर यांनी केले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/532385185105882/