मुस्लीम धर्मियांमध्ये रमजान महिन्यात सुरु असलेले रोजे रमजान ईद दिनी सोडले जातात. रमजानचा महिना मुस्लीम बांधवांमध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस येणारी ईद मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. मुस्लीम कॅलेंडरमध्ये चंद्रदर्शनाला महत्त्व असून, चंद्रदर्शन झाल्यावर ईद ऊल फितर संपूर्ण जगभरात साजरी केली जाणार आहे. Eid Mubarak: Importance of hugs
रमजान महिन्यात तिसावा रोजा झाल्यानंतर जो चंद्र दिसतो, त्याला ईद का चांद मानले जाते. संपूर्ण जगात एकाचवेळी ईद साजरी व्हावी, म्हणून चंद्र दिसल्यानंतरच रमजान ईद साजरी करण्यात येते. या वर्षी मंगळवार ०३ मे २०२२ रोजी ईद उल-फितर म्हणजेच रमजान ईद साजरी होणार आहे.
कथामुस्लिम कथांनुसार, जंग-ए-बद्र नंतर ईद-उल-फितर साजरी करण्याची प्रथा सुरू झाली. या युध्दात मुस्लिमांचा विजय झाला होता आणि याचे नेतृत्व प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर करत होते. त्यामुळे ईद साजरी करुन या विजयाचा आनंद लूटण्यात आला. तसेच याच महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबरांना त्यांच्या अखंड साधनेचे, खडतर तपश् चर्चेचे फळ मिळाले. इस्लामिक धारणेनुसार, अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला. या पवित्र कुराण ग्रंथाचा पहिला संकेत मोहम्मद पैगंबरांना याच दिवशी मिळाला, असे सांगितले जाते. हिंदू बांधवांची दिवाळी तशीच मुस्लीम बांधवाची रमजान ईद त्यामुळे या दिनी मुस्लीम बांधव नवीन वस्त्र परिधान करुन नमाज अदा करतात.
आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी ते प्रार्थना करतात. या दिवशी अदा केलेली नमाज सलात-अल-फज्र या नावाने ओळखली जाते. कुराणातील मान्यतांनुसार, पवित्र रमजानमध्ये संपूर्ण महिनाभर रोजे ठेवणाऱ्यांना अल्लाह बक्षीस आणि इनाम देतो. म्हणूनच या दिवसाला ईद म्हणतात, असे सांगितले जाते. संपूर्ण महिना प्रामाणिकपणे रोजा पूर्ण करण्यासाठी शक्ती, ताकद दिल्याबद्दल ईद दिनी अल्लाहचे आभार मानले जातात. भूख, तहान यांची जाणीव माणसांना व्हावी, या उद्देशाने रमजान महिन्यात रोजे ठेवले जातात.
रोजा ठेवणे आद्य कर्तव्य मानले जाते. रमजान ईद ही मिठी ईद म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी मुस्लीम बांधव आपापल्या घरी मिष्टान्न तयार करतात. विशेष म्हणजे रमजान ईद दिनी शीरकुरमा करून खाण्याची पध्दत आहे. रमजान ईद दिनी गळाभेटीला विशेष महत्त्व असते. या दरम्यान मुस्लीम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये जाऊन ईद साजरी करण्याची प्रथा आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/532792008398533/
☪︎ सर्वच मुस्लीम मुसलमान नाहीत, पाच कर्तव्याचे पालन करणे आवश्यक
□ जगभरात रमजान ईदचा उत्साह, नमाजासाठी मशिदीत गर्दी
जगभरात आज ‘ईद-उल-फित्र’ म्हणजेच ‘रमजान ईद’ साजरी केली जात आहे. ईद हा मुस्लिम धर्माचा सर्वात मोठा सण मानला जातो. या दिवशी प्रत्येकजण आपल्या प्रियजनांना मिठी मारत त्यांना ईदच्या शुभेच्छा देतो. रमजान महिन्यातील 30 दिवसांच्या उपवासानंतर (रोजा) ईदचा सण येतो. सर्व मशीद आणि ईदगाहमध्ये नमाज पठणासाठी लोक जमले आहेत. कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर पहिल्यांदाच ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातं आहे.
□ सर्व धर्मातील कर्तव्याचे पालन
जगातील मानवजातीला कोरोनाने जमिनीवर आणून सोडले होते. जात, धर्म, प्रांत, भाषा, वेशभूषा, गरीब, श्रीमंत उच्च नीच सर्व एकाच खाटेवर झोपण्यास मजबूर केले. माणसांनी माणसावर प्रेम करावे द्वेष भावना ठेवू नये, शक्यतो एकमेकांना मदत करावी हेच शिकविले होते. पण काही लोक हे विसरतात. बिनभांडवली ‘राज’कारणासाठी ते भोंगे आणि हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी शांतीचा संदेश देणाऱ्या रमजान मध्ये ही बाग देतात. त्यांचा उद्देश एकच असतो, दोन समाजाने आपसात मारामारी करून जातीय दंगल घडवावी. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिगडून टाकावी. त्यावर आपले बिनभांडवली राजकारण करून नेता बनावे.
माणूस कोणत्याही जाती धर्माचा राज्याचा प्रांताचा असो त्यांच्याशी प्रेमाने बोलावे त्यांच्या सुखदुःखाची काळजी घ्यावी, कोणताही धर्म नफरत करा असे सांगत नाही. प्रत्येक धर्माचे शांतीचा संदेश देणारे सण आहेत. त्यासाठी त्यांना त्या दिवसात चांगले काम व विचार करण्यासाठी मानसिक शारीरिक दृष्ट्या तयार केल्या जाते.
हिंदू धर्मातील सहा हजार सहाशे जातींना भट ब्राम्हण लोक हिंदू म्हणून एकत्र ठेवून आणि त्यांच्या कडून ब्राम्हणाच्या कट कारस्थानचे दिवस म्हणजे विजय, पराजयाचे दिवस मोठ्या संख्येने सण म्हणून साजरे करण्यास लावतात. जसे कि श्रावण का पाळतात. त्या महिन्यात पोथ्या, पुराण, धर्म ग्रंथ वाचतात. काही आठवडे सोमवार कडक उपवास ठेवतात, दाढी सुध्दा करीत नाही. नंतर गटारी अमावस्या साजरी करतात. बौद्ध धम्म मानणारे लोक वर्षावास तीन महिने पाळतात. तेव्हा बुद्ध आणि त्यांचा धम्म, मिलिंद प्रश्न त्रिपटक सारखी ग्रंथ सामुदाहिक पणे वाचतात. नंतर धम्माला शरण जातात पण संघाला संघटनेला शरण जात नाही. म्हणजेच पंचशिलेचे पालन करीत नाही.
असाच मुस्लीम समाजातील रमजान महिना असतो. तो समाजाला शांती समता व स्वातंत्र्य मिळवून सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवितो.
त्यासाठी कडक उपवास म्हणजे रोजा पकडला जातो. प्रत्येक धर्माचे हे सण मोठ्या संख्येने साजरे केले जातात. तेच सण दरवर्षी नवीन प्रेरणा घेऊन येतात. तरुणांना धार्मिक रीतीरिवाज संस्कार, सांस्कृतिक वारसा देऊन जातात. श्रावण महिना, वर्षावास आणि रमजान काय आहेत हे स्मार्टफोन वापरणाऱ्यांना त्यांचे महत्त्व कळणार नाही. त्यासाठी त्यांचे त्यांना पालन करावे लागेल. हिंदू धर्मात श्रावण पाळण्याचे सांगितले आहे.
बुद्ध धम्मात वर्षावासात पंचशिलेचे पालन करायचे सांगितले आहे. प्रेषित हजरत महंमद पैगंबर रमजानच्या पवित्र महिन्यात काय करायला सांगतात. पाहिले इमान, दुसरा नमाज, तिसरा रोजा चौथा हज आणि पाचवा जकात या पाच कर्तव्य प्रत्येक माणसाने पार पाळले पाहिजे. श्रावण महिन्यात, वर्षावासात आणि रमजान मध्ये लहान मुलामुलींना धर्माचे संस्कार, व सांस्कृतिक कार्याची माहिती दिली जाते. चांगला नागरिक बनण्यासाठी या पाच महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या तर त्याला जात, धर्म, प्रांत, भाषा, वेशभूषा कोणीच अडवू शकत नाही. म्हणूनच रमजान हा केवळ इस्लाम मानणारा मुस्लीम समाज व मुसलमान हेच साजरा करू शकतात असे नाही. माणूस बनण्यासाठी पांच चांगले गुण माणसांच्या आचरणात असले पाहिजे.
इथे दोन उदाहरण देतो. एक देशाचा राष्ट्रपती, दुसरा सरन्यायाधीश विचारांने अधिकाराने खूप मोठ्या पदावर विराजमान होते. पण आचाराने गुलाम झाले. कोणता आदर्श निर्माण करूच शकले नाही. धर्माचे संस्कार, शिक्षण हे वाघिणीचे दूध असते यांनी काय सिद्ध करून दाखविले. असो…
पंचशिलेचे पालन करणारा कोणीही असू शकतो. इस्लाममध्ये सांगितलेल्या पाच कर्तव्याचे पालन करणारा कोणीही असू शकतो. माणसाला माणसासारखे वागविण्याची शिकवण देणारा धर्म व धम्म जगात ओळखला जातो. जो माणसासोबत माणसासारखा वागत नसेल तर तो माणूस असू शकत नाही. तो ब्राम्हण असू शकतो. म्हणूनच माणसं ओळखण्यासाठी धर्माची धम्माची शिकवण मुलामुलींना लहानपणापासून दिली पाहिजे.
सर्वच मुस्लीम मुसलमान नाहीत. जो मुसलमान पाच कर्तव्याचे पालन करत नसेल तर तो इस्लाम मानणारा असू शकत नाही. इस्लाम मानणारा मुस्लीम इमानदार, नमाज पडणारा, रोजा ठेवणारा, हज करून आलेला आणि न चुकता समाजाच्या उन्नतीसाठी जकात दरवर्षी देणारा असतो. मानव प्राण्यावर नेहमी प्रेम करतो. सहानुभूती दाखवितो आणि नियमितपणे सहायता करतो. रमजान मध्ये रोजा पकडणे म्हणजे सर्व वाईट कामावर सवयीवर विजय मिळविण्यासाठी तयार करणे होय. रोजा पकडला असेल तर वाईट मार्गापासून दूर राहिले पाहिजेच व वाईट लोकांच्या जवळपास थांबायला मनाई असते. रोजा जेव्हा पकडला जातो तेव्हा भूख, तहान काय असते यांची त्यांना जाणीव होते. त्यामुळेच भुख्या प्यास्या माणसाला पाहून रोजा पकडणाऱ्याच्या मनात दया उत्पन्न होते. सकारत्मक विचाराचे मनात घर पक्के होते. त्यातूनच दान करण्याची इच्छा होते. त्यामुळे पुण्य लाभते, मनाची एकाग्रता लागते.
– सागर तायडे
https://www.facebook.com/109399567404448/posts/532787068399027/