□ राज्यापुढे लोकहिताचे अनेक प्रश्न
मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी औरंगाबादेत जाहीर सभा झाली. तिला उपस्थिती लक्षणीय होती. घराघरातल्या लोकांनी टीव्हीवरुनही त्यांचे भाषण ऐकले. गुढी पाडव्याच्या दिवशी मुंबईत त्यांनी जी सभा घेतली, त्यात राज्याच्या ध्यानीमनी नसताना एक मोठा बॉम्ब टाकला, तो म्हणजे राज्यातील मशिदींवरचे भोंगे उतरवण्याचा. ‘Raj’ reason: Be social conscious while taking aggressive steps
रमजान ईद झाल्यानंतर भोंगे नाहीं उतरले तर आम्ही मशिदींपुढे भोंगे लावू आणि त्यावर हनुमान चालिसा लावू, असा इशारा त्यांनी दिल्यानंतर महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात तणावाचे वातावरण पसरले. राज यांनी हा बॉम्ब टाकल्यानंतर गेल्या महिनाभरापासून त्यावर वाद विवाद सुरु आहे. इशारे प्रतिइशारे दिले जात आहेत. राज्यात काही ठिकाणी भोंगे लावून हनुमान चालिसा म्हणण्याची तयारी देखील केली गेली आहे. ही सारी पार्श्वभूमी पाहाता राज हे औरंगाबादच्या सभेत काय बोलणार याबाबत राज्यात उत्सुकता होती. महाराष्ट्राची आजची अवस्था खरीच दैना झाली आहे. राज्यापुढे लोकहिताचे अनेक प्रश्न असताना त्यावर कुणीच बोलत नाही. इंधनाचे दर भडकले आहेत. वीज टंचाईचा भस्मासुर आला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भावही गगनाला भिडले आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/532787068399027/
राज्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई आहे. लोकल बॉडीवर सत्ता नसल्याने लोकांना कुणी वाली राहिलेला नाही. ग्रामीण भागातील शेतरस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. पालकमंत्र्यांच्या हाती कारभार देऊन लोकल बॉडी चालवण्याची गरज आहे. या प्रश्नांकडे एकाही राजकीय पक्षाचे लक्ष नाही, ही खेदाची बाब म्हणावी लागेल. राजकारण्यांना बर्निंग विषय हवेत तर मीडियाला आपल्या टेरिफसाठी चमचमीत बातमी हवी आहे. कुणावरही कुणाचे अंकुश नाही. ही एक प्रकारे अराजकताच म्हणावी लागेल.
राज यांनी आजच्या या दैनावस्थेकडे लक्ष वेधले. राज्याची इतकी विदारक स्थिती असताना महाराष्ट्र दिन काय म्हणून साजरा करायाचा ? हा त्यांचा प्रश्न पटण्यासारखा आहेच. हे सत्य कुणालाच नाकारता येणार नाही. भोंगे उतरवण्याच्या निर्धाराबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते आक्रमकपणे राज यांच्यावर तुटून पडले. विशेषतः शरद पवारांनी जी टीका केली होती, ती राज यांच्या वर्मी लागली. औरंगाबादच्या सभेत त्यांनी त्याचा वचपा काढलाच. भाषणाच्या मध्यतरास राज यांनी पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाची, स्वभावाची आणि राजकीय कामगिरीची राज यांनी चिरफाडच करुन टाकली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/532874711723596/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
आपण नास्तिक म्हटल्यानंतर पवारांनी आपली भूमिका कशी बदलली हे सांगितेच शिवाय जाहीर सभांमधून ते सुरुवातीला कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत नव्हते, असे आपण निदर्शनास आणून दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या सभांमध्ये आता कुठे छत्रपतींचे बॅनर झळकत आहेत, असे राज म्हणाले.
विशेष म्हणजे मध्यंतरी राज्यात जो एक कळीचा मुद्दा राज्याच्या समोर आला होता, त्याचेही राज यांनी पवारांवर एक ना अनेक टीकेचे घाव घालत पोस्टमार्टम केले. पवार हे आपल्या सोयीची पुस्तके वाचतात. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना केवळ ब्राह्मण म्हणून त्रास दिला. जेम्स लेनचा विषय आणून राज्यात तेढ निर्माण केली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासूनच राज्यात जातीयवाद सुरु झाला. पवार हे प्रत्येकाची जात बघतात, असा घणाघात राज यांनी अत्यंत धाडसाने केला.
राज यांनी मांडलेल्या या साऱ्या मुद्यांवर पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेस चालवणाऱ्यांना नेत्यांना आत्मचिंतन करावे लागणार आहे. सत्य बरेच सांगता येते पण राजकारण्यांना ते रुचत नाही. खोटे बोल पण रेटून बोल, असा साऱ्याच राजकीय पक्षांचा शिरस्ता झाला आहे. पवार यांच्यानंतर राज हे आपल्या भोग्यांच्या मूळ विषयावर आले. सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आधार घेत त्यांनी भोंगे लावण्याचा आणि रस्त्यावर नमाज अदा करण्याचा अधिकार कोणी दिला, हा त्यांनी उपस्थित करताना तीन मेनंतर भोंगे उतरवले गेले नाहीत तर चार मेपासून हनुमान चालिसा वाजवला जाईल, असा इशारा दिल्यामुळे सरकार आणि गृहखात्याला सतर्क राहावेच लागेल. कारण कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल.
मशिदींप्रमाणे अनेक हिंदू देवदेवतांच्या मंदिरावरही लाऊडस्पिकर आहेत. जर काढायचेच असतील तर सर्वच ठिकाणचे भोंगे काढायला हवेत. हीच खरी समानता ठरेल. योगी आदित्यनाथ यांनी तोच फार्म्युला वापरला. राज हे शिवसेनाप्रमुखांच्या स्टाईलमध्ये जी असंसदीय भाषा वापरली, ती राज्याला रुचलेली नाही. पोलिसांची अनुमती घेऊन भोंगे लावले जात असतील तर त्याची बजबजपुरी पुन्हा माजेल तेव्हा आवाजाचा पुन्हा प्रश्न निर्माण होईल.
आवाजाची क्षमता ठेवण्याचे बंधन कोणच पाळणार नाही. तेव्हा एकतर सरसकट भोंग्यांवर बंदीच घाला. भोंग्यांचा विषय हा सामाजिक आहे, धार्मिक नाही, अशी चलाखी राज यांनी दाखवली पण हा धार्मिक विषयच ठरतो. तेव्हा एखादे आक्रमक पाऊल टाकताना त्यांना सामाजिक भानही ठेवावेच लागेल. बगल देऊन कसे चालेल?
✍ ✍ ✍
● दै. सुराज्य संपादकीय लेख
https://www.facebook.com/109399567404448/posts/532792008398533/