मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात सांगलीच्या शिराळा कोर्टाने अटक वॉरंट बजावण्यात आले आहे. एका जुन्या प्रकरणात हे वॉरंट जारी करण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या मशिदीवरील भोंग्यांबाबत घेत असलेल्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. Arrest warrant against Raj Thackeray; Today will be the next direction of MNS
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंतर गृहखातं अॅक्शन मोडमध्ये आले आहे. राज ठाकरेंनी भोंग्यांवरुन इशरा दिल्यानंतर गृहमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. उद्यापासून मशिदीवरील भोंगे काढले नाहीत तर मशिदींसमोर हनुमान चालिसा दुप्पट आवाजात वाजवण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस अलर्ट झाले आहेत. मुंबई आणि ठाण्यातील प्रमुख मनसे नेत्यांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. तर काहींना पोलीस ठाण्यात बोलावले आहे.
दुसरीकडे जुन्या प्रकरणामुळे राज यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सांगलीच्या शिराळा कोर्टाचे राज ठाकरेंविरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे. ठाकरे यांनी काही वादग्रस्त विधानं केल्याचाही आरोप झाला. यावेळी सांगलीच्या शिराळ्यात मनसेच्या कार्यतर्त्यांनीही आंदोलन केलं होतं. या पदाधिकाऱ्यांवरही कारवाई झाली होती. या प्रकरणात राज ठाकरे यांच्या नावाचाही उल्लेख होता.
https://www.facebook.com/109399567404448/posts/532874711723596/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
महिनाभरापूर्वी शिराळा कोर्टाने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले होते. मात्र महिनाभरापासून पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. पाच ते दहा वर्षांपूर्वीच्या केसेस निकाली काढण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स आहेत. त्यानुसार ही प्रकऱणं आतापर्यंत मार्गी लागणं आवश्यक होतं. मात्र, अद्याप कारवाई न झाल्याने कोर्टाकडून पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकतं.
धर्मस्थळावरील भोंगे काढण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर राज यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. निवडक पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर राज ठाकरे भोंग्यांबाबतचे पक्षाचे धोरण जाहीर करणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कारवाईची शक्यता आहे. औरंगाबादमधील सभेतील भाषणात राज ठाकरेंनी 4 मे पासून मशिदीवरील भोंगे बंद नाही झाले तर मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवावी, असे आदेश कार्यकर्त्यांना केले आहेत. त्यामुळे अटी शर्थींचं उल्लंघन केल्याचा अहवाल पोलिसांनी तयार केला आहे. 3 पैकी 2 अहवाल सादर झालेत तर 1 अहवाल अजून प्रतीक्षेत आहे. त्यानंतर अहवाल गृहमंत्र्यांकडे पाठवला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
पोलिसांच्या सुरक्षा शाखेचा आणि गुप्तवार्ता विभागाचा अहवाल तयार झाला आहे. तर पोलिसांचा कारवाई बाबतच अहवाल मात्र अजून प्रतीक्षेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 16 पैकी 5 अटींचे उल्लंघन झाले आहे. याबाबत अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे. आवाजाची मर्यादा ओलांडली असून, दोन धर्मात तेढ निर्माण होईल असेही वक्तव्य केल्याचं अहवालात माहिती असल्याचं सूत्रांनी म्हटले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/532915391719528/