बार्शी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या डिसेंबर २०२१/ फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या ऑनलाईन परीक्षेत राज्यातील ५५७६ विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचे आढळले आहे. या विद्यार्थ्यांना परीक्षा विभागाने नोटीस बजावली असून त्यांचे म्हणणे मागविण्यात आले आहे. Misconduct by students in open university online exams
या विद्यार्थ्यांवर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोणत्याही कारणाने अर्धवट राहिलेले आपले शिक्षण नियमित कामकाज सांभाळून पूर्ण करता येते म्हणून राज्यातील हजारो नागरिक मुक्त विद्यापीठाची वाट चोखाळत आहेत. अनेक पारंपरिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम मुक्त विद्यापीठाने आणले आहेत. राज्यातील शेकडो केंद्रांमार्फत इच्छुकांना या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो. दर रविवारी या केंद्रातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. कोरोना काळापासून मुक्त विद्यापीठाने प्रवेशीत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन परीक्षेचा अंगीकार केला आहे.
या परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीने होतात. विद्यार्थ्यांना लॉगिन आय डी आणि पासवर्ड दिला जातो. दिलेल्या वेळेत विद्यार्थ्याने लॉगिन होऊन पेपर सोडवायचे असतात. ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार होऊ नयेत म्हणून विद्यापीठाने विशेष तांत्रिक व्यवस्था केलेली आहे. त्यानुसार परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत विद्यार्थ्यांना स्पष्ट सूचना दिल्या जातात. ज्या विद्यार्थ्यांनी सूचनांचे पालन केले नाही. त्या विरुद्ध वर्तन केले आहे. त्यांची परीक्षेनंतर चौकशी केली जाते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/532787068399027/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
त्यातून निष्पन्न होणाऱ्या बाबींवरून त्याच्यावर कारवाई केली जाते. विद्यार्थी ज्या संगणक, लॅपटॉप अथवा’ मोबाईल या साधनाद्वारे ही परीक्षा देतो, त्या साधनाच्या कॅमेऱ्यातून विद्यापीठाची यंत्रणा परीक्षा वेळेतील विद्यार्थ्यांच्या हालचाली टिपते. त्याचप्रमाणे याच कॅमेऱ्यातून त्यांची ओळख पटवली जाते. आपआपल्या साधनाचा कॅमेरा चालू ठेवणे, ही प्राथमिक व बंधनकारक अट आहे. डिसेंबर २०२१ व फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या ऑनलाईन परीक्षेत ५५७६ विद्यार्थ्यांचे वर्तन संशयास्पद आढळले आहे.
या विद्यार्थ्यांनी लॉगिन करताना अथवा परीक्षा चालू असताना आपल्या संगणकाचा / मोबाईलचा कॅमेरा बंद ठेवला आहे. त्यामुळे त्यांचा फोटो सिस्टम मध्ये येऊ शकलेला नाही. त्यामुळे विद्यापीठाकडे असलेल्या विद्यार्थ्याच्या फोटोशी प्रत्यक्ष परीक्षा देणाऱ्याची इमेज सिस्टीमला पडताळता आलेली नाही. त्याचप्रमाणे काही प्रकरणात विद्यार्थ्याने लॉगिन केल्यानंतर आपला फोटो दिल्यानंतर परीक्षा दुसऱ्याच विद्यार्थ्याने दिल्याचे आढळून आले आहे.
एकाच वेळी विद्यार्थी आणि त्याच्यासमवेत अनेक लोकांनी मिळून परीक्षा दिली असल्याचीही काही प्रकरणे आढळून आली आहेत. काही प्रकरणात विद्यार्थ्यांनी आपली इमेज संगणकामध्ये येऊ दिलेली नाही. अशाप्रकारे गैरप्रकार करणाऱ्यांची यादी परीक्षा यंत्रणेकडे तयार झाली आहे.
या विद्यार्थ्यांना नोटीस देऊन त्याबाबत आपले म्हणणे सादर करण्याची सूचना देण्यात आली होती. त्यानुसार औरंगाबाद, मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर, अमरावती व नागपूर या विभागीय केंद्राद्वारे त्यांचे म्हणणे प्राप्त करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांनी सादर केलेला खुलासा योग्य न आढळून आल्यास त्यांच्यावर परीक्षा नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/532915391719528/