जयपूर : राजस्थानच्या जोधपूरमध्ये ईद आणि अक्षय्य तृतीयेच्या आधी झेंडा व लाऊडस्पीकर वरुन दोन समुदायांमध्ये हिंसक संघर्ष झाला. दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली, त्यात अनेक जण जखमी झाले. जमावाने लाऊडस्पीकर व झेंडे काढून टाकले आहेत. रात्री उशिरापासून या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान, तिकडे काश्मिरातील अनंतनाग येथे ईदच्या नमाजानंतर भारतीय सैनिकांवर दगडफेक करण्यात आली.
करौलीमध्ये हिंदू नववर्षानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान हिंसा घडलेली होती. त्यानंतर कर्फ्यू लावण्यात आला होता आणि कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. प्रशासनाकडून इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि ६०० पोलीस कर्मचाऱ्यांनी तैनात करण्यात आली होती. हिंसाचारात सुमारे २४ लोक जखमी झालेले होते. आज मंगळवारी ईद, परशुराम जयंती आणि अक्षय तृतीया हे तिन्ही सण एकत्र आले आहेत. राजस्थानमधील या घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
राजस्थानमधील जोधपूर येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तात्पुरती इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यासंदर्भात आज मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयातून आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा दंडाधिकारी यांच्या निवेदनानुसार जोधपूर जिल्ह्यात मंगळवारी १ वाजता इंटरनेट बंद करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले होते. एप्रिल महिन्यात झालेल्या सांप्रदायिक हिंसेमुळे हा आदेश देण्यात आला आहे.
https://twitter.com/ANI_MP_CG_RJ/status/1521384450684506112?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1521384450684506112%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
जोधपूरच्या जालोरी गेटजवळ सोमवारी रात्री मोठा गोंधळ निर्माण झाला होता. स्वातंत्र्यसेनानी बाल मुकुंद बिस्सा यांच्या मूर्तीवर झेंडा फडकविण्यात आला होता आणि ईदनिमित्त रस्त्यावर लावण्यात आलेल्या बॅनरमुळे तणाव निर्माण झाला होता. समोर आलेल्या माहितीनुसार दोन समुदायांमध्ये जोरदार संघर्ष वाद झालेला होता. परिस्थिती इतकी चिघळली की, पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
या हिंसाचारात अनेक गाड्यांचे नुकसान झाले. सध्या संवेदनशील परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सरकारी आदेशानुसार 2G/3G/4G/डेटा (मोबाइल इंटरनेट), बल्क एसएमएस/एमएमएस/व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर और अन्य सोशल मीडियाच्या सेवा तात्पुरत्या बंद करण्याात आल्या आहेत. आदेशात पुढे असे सांगण्यात आले आहे की, जोधपूरमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि शांतता टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झालेले आहे.
राजस्थानमधील जोधपूर येथील घटनेवर शोक व्यक्त करताना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही लोकांना शांततेचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून लिहिले की, “जोधपूरच्या जालोरी गेट येथे दोन गटांमध्ये वाद झाल्याने तणाव निर्माण होणे दुर्दैवी आहे. कोणत्याही परिस्थितीत शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. जोधपूर, मारवाड येथील प्रेम आणि बंधुभावाच्या परंपरेचा आदर करत मी सर्व पक्षांना शांतता राखण्याचे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करतो.”