मुंबई / औरंगाबाद : हिंदू जननायक अशी प्रतिमा तयार झालेले राज ठाकरे हे ठाकरे सरकारच्या निशाण्यावर आले आहेत. राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादेतील सभेप्रकरणी 16 पैकी 12 अटींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबावात पोलिस खोटे गुन्हे नोंदवत असल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. ‘Hindu Jananayak’ on Raj Thackeray’s target, case finally filed against Raj Thackeray
‘हिंदू जननायक’ अशी प्रतिमा तयार होत असलेल्या राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची तयारी ठाकरे सरकारने केली होती. औरंगाबादेत राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु असल्याची माहिती दिली होती. दरम्यान, राज ठाकरे यांच्या भाषणाबाबत औरंगाबादचे पोलीस आयुक्त तपास करुन आवश्यक कारवाई आजच करतील, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली होती. त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला.
सभेस तब्बल 16 अटी लावण्यात आल्या होत्या. यातल्या काही अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी देखील राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा झाल्याची माहिती आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/532981808379553/
दरम्यान, मनसे उद्याच्या आंदोलनावर ठाम आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषेत पत्रक काढून मनसे आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देशभरातील हिंदू बांधव आणि महाराष्ट्रातील मनसे कार्यकर्ते यांना संबोधित करणार असल्याचे वृत्त आहे.
भोंगे काढण्याचा अल्टिमेटम आज संपणार आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये रस्ताही अनेक पाऊल पोलीस उचलत आहेत. राज्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या 87 तुकड्या तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, 30 हजार होम गार्डच्या जवानांनाही तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलीस महासंचालकांनी दिली. तसेच मनसेच्या अनेक नेत्यांना नोटिसा पाठवल्या आहेत, तर काही जणांना तडीपार करण्यात आले आहे.
उद्याचे आंदोलन लक्षात घेता गृहविभाग ॲक्शन मोडमध्ये आला असून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या जात आहेत. मनसे नेते बाळा नांदगावर, संदीप देशपांडे नितीन सरदेसाई यांच्यासह राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. औरंगाबादमध्ये मनसेच्या 3 शहराध्यक्षांसह 40 जणांना कलम 149 अन्वये गुन्हा प्रतिबंधक नोटीस पाठवण्यात आली आहे.
राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कठोर पावले उचला, असे आदेश गृहमंत्र्यांनी पोलिसांना दिलेत. जे कायदा सुव्यवस्था बिघडवतील, त्यांना ताब्यात घेतले जाईल, तसेच तेढ पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेत. गृहमंत्र्यांनी राज्यातल्या पोलिसांची बैठक घेतली. त्यामध्ये पोलिसांनी हे आदेश देण्यात आलेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/532952995049101/