सोलापूर : पोलीस आयुक्तालयाकडे मनुष्यबळ कमी असल्याने महापालिकेला पोलीस फोर्स मिळू शकत नसल्याचे पत्र पोलीस प्रशासनाने महापालिकेला पाठविले आहे. दरम्यान मला सुरक्षा नसली तरी चालेल मात्र शहरातील अतिक्रमण कारवाई वेळी पोलीस बंदोबस्त गरजेचा आहे, असे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी म्हटले आहे. I don’t, at least give police protection to remove the encroachment – Solapur Municipal Commissioner
पोलीस उपायुक्ताच्या स्वाक्षरीने महापालिकेला पोलीस फोर्स मिळू शकत नसल्याचे पत्र शनिवारी (ता. 30) महापालिकेला मिळाले आहे. मनुष्यबळ कमी असल्याने महापालिकेला मागणीनुसार पोलीस बंदोबस्त देऊ शकत नसल्याचे या पत्रात नमूद केले आहे. महापालिका आयुक्तांना पोलिसांकडून एक सुरक्षा रक्षक दिला जातो.
मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी पोलीस
आयुक्त तसेच अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी असलेल्या एकूण सात पोलीस कर्मचारी पोलीस आयुक्तालयाकडून काढून घेण्यात आले आहे. यावर बोलताना आयुक्त म्हणाले की , पोलीस बंदोबस्त अभावी महापालिका प्रशासनाची अतिक्रमण विरोधी कारवाई खोळंबली आहे. किमान रस्त्यावर अडथळा असणारे अतिक्रमण काढण्यासाठी तरी वाहतूक पोलीस मिळावे. ते मिळाल्याशिवाय अतिक्रमण काढता येणार नाही. या संदर्भात आवश्यक ती चर्चा पोलीस प्रशासनाची करणार असल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून खासगी जागेतील अतिक्रमण कारवाई करिता महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनकडील शस्त्रधारी दहा सिक्युरिटी गार्ड मागवण्यात येणार आहेत, त्याची प्रक्रिया सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/533078695036531/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ अभियंता बडतर्फ तर उपअभियंत्यावर निलंबनाची कारवाई
सोलापूर : बेकायदेशीर काम केल्याबद्दल पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सहाय्यक अभियंता अतुल भालेराव आणि लिपिकास बडतर्फ केले तर कामात कुचराई करणाऱ्या ड्रेनेज विभागाचे उपअभियंता विजयकुमार बाबूराव राठोड यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. सोमवारी (ता. 2) एकाच दिवशी आयुक्तांनी ही कारवाई केल्याने पालिकेत खळबळ उडाली आहे.
शौचालय पाडून ती जागा खासगी व्यक्तीच्या नावे केली तसेच इतर आरोपावरून सहाय्यक अभियंता अतुल भालेराव आणि लिपिकास पालिका आयुक्तांनी बडतर्फ केले आहे. सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. महापालिकेच्या जागेवर असलेले शौचालय बेकायदेशीररीत्या पाडून ती जागा परस्पर एका खासगी व्यक्तीच्या नावे केल्याने महापालिकेचे नुकसान केल्याचा ठपका भालेराव यांच्यावर ठेवला आहे.
भालेराव व त्यांचा सहकारी लिपिकास कामावरून काढण्याची कारवाई आयुक्तांनी केली. तर केंद्र शासनाच्या सफाई मित्र अभियान या ॲपवर सोलापूर महानगरपालिकेची माहिती भरण्यापूर्वी त्याची तपासणी करून खात्रीअंती ॲपवर अपलोड करण्याची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली नसल्याप्रकरणी ड्रेनेज विभागाचे उपअभियंता विजयकुमार राठोड यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/533094441701623/