…पण सीएम ममतादीदींचे प्रत्युत्तर
कोलकाता : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठं विधान केलंय. कोरोना संपल्यानंतर नागरिकत्व कायदा लागू करू असं शाह म्हणाले. ‘कोविड महामारी संपल्यावर आम्ही CAA (Citizenship Amendment Act) लागू करू. ममता दीदींना घुसखोरी हवी आहे, पण CAA हे वास्तव आहे, त्याची अंमलबजावणी केली जाईल’, असं ते म्हणाले. शाह बंगाल दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी हे विधान केलं. CAA will enforce the law as soon as the corona ends – Amit Shah
अमित शहा सध्या दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) हे वास्तव असून तृणमूल काँग्रेस त्याबाबत काहीही करू शकत नाही, असे ते म्हणाले. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या शाहीन बागसह देशाच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली होती. हा कायदा नागरिकांच्या विरोधामुळे अनेक काळांपासून फाईलींमध्ये बंद करुन ठेवल्याचे बोलले जात होते. पण तसे नाही अमित शहा यांनी पुन्हा राग आवळला आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात २०१९ सालाच्या शेवटी २०२० च्या सुरुवातीच्या काळात देशभरात मोठी निदर्शने करण्यात आली होती. या कायद्यास नागरिकांचा विरोध पाहता त्यावेळी हा कायदा केंद्रसरकारने तातडीने लागू केला नाही. आता गृहमंत्री अमित शहा यांच्या म्हणण्यानुसार त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://twitter.com/ANI/status/1522202475805417474?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1522202475805417474%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
पश्चिम बंगालच्या सिलीगुडी जिल्ह्यातील कार्यक्रमाप्रसंगी बोलताना अमित शहा म्हणाले की, तृणमूल काँग्रेस अफवा पसरवत आहे, की नागरिकत्व कायदा कधीही येणार नाही. पण मी त्यांना सांगू इच्छितो की कोरोना महामारी संपल्यावर आम्ही सीएए कायदा (CAA) लागू करू. ममता दीदींना घुसखोरी हवी आहे, पण सीएए कायदा हे वास्तव आहे आणि त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
कोरोना संपल्यानंतर नागरिकत्व कायदा लागू करू असे मोठे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पश्चिम बंगालमध्ये केले आहे. त्यानंतर आता पश्मिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर देत आगीशी खेळू नका असे म्हणत जनता चोख उत्तर देईल, असे विधान केले आहे.
तुम्ही केंद्रीय गृहमंत्री असून, मी तुमचा आदर करते. मात्र, याचा अर्थ मला मार्गदर्शन करणे किंवा बीएसएफला राज्यावर सत्ता गाजवायला सांगणे असा होत नाही असेही ममता यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकार सीएए विधेयक संसदेत का आणत नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच नागरिकांच्या हक्कांवर गदा येऊ नये असे वाटते. यासाठी आपण सर्वांनी एकत्र राहणे गरजेचे असून, एकता हीच आपली ताकद असल्याचे ममतादीदी म्हणाल्या.
गाईची तस्करी, घुसखोरी रोखणे आणि सीमेवर शांतता राखणे हे पाहणे आपले कर्तव्य असून, दिल्लीच्या जहांगीरपुरी, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात काय झाले त्याकडे गृहमंत्र्यांनी बघावे. बंगालची चिंता करू नये असेही बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. भाजपचे काम फुटीरता निर्माण करण्याचे असून, केंद्रीय गृहमंत्री म्हणून त्यांनी काय केले? असा प्रश्न उपस्थित करत ईदच्या दिवशीही हिंसाचार केल्याची टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे.