सोलापूर : कालिचरण महाराज वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणारे कालिचरण महाराज, राज ठाकरे यांनी घेतलेल्या भोंग्यांच्या भूमिकेचं समर्थन करताना दिसत आहेत. पण महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या भोंग्याविषयी घेतलेल्या भूमिकेचं जोरदार समर्थन करणाऱ्या महाराज कालीचरण यांनाचं हनुमान चालीसा येत नाही, याची कबुली खुद्द कालीचरण यांनी सोलापुरात कॅमेऱ्यासमोर दिली आहे. My support to Raj Thackeray; Kalicharan Maharaj confesses in Solapur that Hanuman Chalisa is not coming
कालीचरण महाराज हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंनी खरी मर्दानगी दाखवली आहे असे वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले आहे. भोंग्यांबाबत राज ठाकरेंची भूमिका योग्य आहे, आणि त्याला संपूर्ण पाठिंबा आहे, असे कालीचरण महाराज म्हणाले.
जगदंबा देवी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी ते सोलापूर येथे आल्याची माहिती त्यांनी दिली. सोलापूर शहरातील शिवस्मारक सभागृहात त्यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. प्रवचनाअगोदर त्यांनी माध्यमांसमोर बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कौतुक केले.
सध्या महाराष्ट्र राज्यात मशिदीवरील भोंग्यावरून सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. 4 मे पासून मशिदीवरील भोंगे न उतरवले असता त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा, असे आवाहन राज ठाकरेंनी केले होते. यावर कालीचरण महाराज यांनी राज ठाकरेंना संपूर्ण पाठिंबा असल्याची सांगितले. राज ठाकरेंनी खरी मर्दानगी दाखवली असे सांगितले. राज्यात लवकरात लवकर हिंदू हितेशी कायदे बनले पाहिजेत. असेही यावेळी ते आवर्जून म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेतले. या मंदिरात भक्तीगीते सादर करून कालिचरण महाराजाने भाविकांना मंत्रमुग्ध केले.
‘जो हिंदू हितकी बात करे… उसी को हम मतदान करेंगे… ‘अशीच आमची भूमिका आहे. हिंदूच्या हितासाठी बोलणाऱ्यालाच मतदान होईल, आम्ही त्याच्याच बाजूने उभे राहू. जनतेच्या मनात हिंदू प्रेम आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत दिसेल की हिंदू काय करतील, असेही कालिचरम महाराजने म्हटले आहे. यावेळी त्याच्यासमवेत शेकडो भक्तगण उपस्थित होते.
दरम्यान, आमचा राज ठाकरे यांना पाठिंबा आहे. त्यांच्याविरोधात कुणी कितीही बोलत असले, तरी न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. तसेच धर्मजागरणाचे कर्तव्य आपण बजावत असल्याचे कालिचरण महाराजाने स्पष्ट केले. जे सत्तेत आहेत, त्यांनी हिंदू हिताची बाजू घेतली, तर त्यांनाही पाठिंबा असेल, असे कालिचरण महाराजांने नमूद केले. हिंदूंच्या हिताचे बोलणाऱ्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहणार असल्याचेही कालिचरण महाराजाने सांगितले.
कोरेगाव – भीमा प्रकरणात भिडे गुरुजींना क्लीन चिट मिळणे हा हिंदुत्वाचा विजय आहे. कालिचरण महाराजाला हनुमान चालिसा म्हणायला सांगितली असता तो म्हणाला माझी हनुमान चालीसा पाठ नाही, मी तर कालीचा उपासक असल्याचे म्हटले.