□ जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते रविवारी वितरण
सोलापूर : जगतज्योती महात्मा श्री बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त बसव ब्रिगेड शहर शाखेतर्फे आठ जणांना बसवरत्न तर एक व्यक्तीला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारांचे वितरण रविवारी (ता.8) सायंकाळी सहा वाजता शिवस्मारक सभागृहात होणार असल्याची माहिती बसव ब्रिगेडचे शहराध्यक्ष अमित रोडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. Solapur: Basava Brigade’s Basavaratna award announced, distribution on Sunday
बसव ब्रिगेडतर्फे देण्यात येणाऱ्या बसवरत्न पुरस्कारांमध्ये संस्कृती क्षेत्रातील कामासाठी मल्लिकार्जुन मुलगे, सामाजिक क्षेत्रातील कामासाठी (मरणोत्तर) ओंकार पदमकोंडा, शैक्षणिक क्षेत्रातील कामासाठी मयुरी खेड, क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी पंचाक्षरी लोणार, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. नीलरोहित पैके, प्रबोधनपर कार्यासाठी डॉ. भीमाशंकर जिंदगी, कला क्षेत्रातील कामगिरीसाठी महेश शहाणे, उद्योग क्षेत्रात भरीव कार्यासाठी वीरेंद्र हिंगमिरे यांना गौरविण्यात येणार आहे. तर बसव सेंटरच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या सिंधुताई काडादी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीशैल हत्तुरे असतील. तर स्वागताध्यक्ष खलिल शेख, युवा उद्योजक उदयशंकर पाटील, नगरसेवक किरण देशमुख नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, जि. प. सदस्य अमर पाटील, छत्रपती फाऊंडेशनचे संतोष पवार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य जुबेर बागवान यांची प्रमुख उपस्थिती असेल.
समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या बसवरत्न पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी सोलापूरकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजक आणि बसव ब्रिगेडचे शहराध्यक्ष अमित रोडगे यांनी यावेळी केले.
या पत्रकार परिषदेस पंडीत जळकोटे, प्रा. शिवलिंग अचलेरे, धोंडप्पा तोरणगी, मल्लिकार्जुन बामणे, श्रीशैल भोगडे, मयूर स्वामी, अजिंक्य उप्पीन आदी उपस्थित होते.
□ उष्माघाताची कारणे काय आहेत?
#lifestyle #health #teps
– गरम वातावरणात दीर्घकाळ राहणे.
– जर कोणी अचानक थंड वातावरणातून उष्ण ठिकाणी गेले तर त्याला उष्माघात होण्याची शक्यता असते.
– उष्माघाताचे एक मुख्य कारण गरम हवामानात अति व्यायाम करणे हे देखील आहे.
– उन्हाळ्यात जास्त घाम आल्यावर पुरेसे पाणी न पिल्याने देखील याचा त्रास होऊ शकतो.
– उन्हाळयात असे कपडे परिधान केले की ज्यातून घाम व हवा निघत नसेल तरीही उष्माघाताचा धोका वाढू शकतो.