मुंबई : राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर विद्या चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार फौजिया खान यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. तसेच महागाईसारख्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाला आहे. महिला वर्ग त्रासला आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Vidya Chavan is the new woman state president of NCP
रुपाली चाकणकर यांनी राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. आता या निवडीमुळे चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदी माजी आमदार श्रीमती विद्याताई चव्हाण यांची निवड करण्यात आली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/534465131564554/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष खा. डॉ. फौजिया खान यांनी आज विद्या चव्हाण यांना नियुक्ती पत्र दिले. महिला संघटनेला अधिक बळकटी देण्यासाठी विद्या चव्हाण जोमाने काम करतील, असा विश्वास फौजिया खान यांनी व्यक्त केला. विद्या चव्हाण यांची राष्ट्रवादीच्या अभ्यासू नेत्या अशी ओळख आहे. त्यांना विधानपरिषदेवर देखील संधी देण्यात आली होती.
फौजिया खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर विभाग अध्यक्षा शाहीन हकीम (गडचिरोली), अमरावती विभाग अध्यक्षा वर्षा निकम (यवतमाळ), मराठवाडा विभाग अध्यक्षा शाजिया शैख (जालना), वैशाली मोटे (उस्मानाबाद), पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता म्हेत्रे (सातारा), वैशाली नागवडे (पुणे), कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे (सिंधुदुर्ग), ठाणे विभाग अध्यक्षा ऋता आव्हाड (ठाणे), उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता परदेशी यांची नियुक्तीही खासदार फौजिया खान यांनी जाहीर केली. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला आहे. ऋता आव्हाड यांची राष्ट्रवादी महिला ठाणे विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
● भजनी मंडळाचा टेम्पो- कारचा भीषण अपघात, दोन ठार, 11 जखमी
#sangali #कार #car #accident #killed #surajyadigital #tempo #सुराज्यडिजिटल
सांगलीत रात्री भीषण अपघात झाला. यात दोन जण जागीच ठार तर 11 जण जखमी झाले आहेत. भजनी मंडळाचा टेम्पो आणि वॅगणार कारची समोरासमोर धडक झाली. तुंग येथील काही भजनी मंडळाच्या महिला टेम्पोमधून शिरोळकडे चालले होते. यावेळी आयर्विन पुलावर समोरून येणाऱ्या कार आणि टेम्पोमध्ये जोरदार धडक झाली.
या अपघातामध्ये टेम्पो चालकासह एक वृद्ध महिला जागीच ठार झाली आहे. तुंग येथून एक भजनी मंडळ कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ येथे भजन कार्यक्रमासाठी छोट्या टेम्पोमधून निघाले होते, अशी माहिती आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/534491898228544/