● महाआघाडीला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही
सोलापूर : वीज महामंडळाने लोडशेडींग बंद करावे, ग्रामपंचायतीच्या पाणी पंपांना पूर्ण वेळ वीज पुरवठा करावा, मंद्रुप एमआयडीसीसाठी अधिग्रहित करण्यात येणा-या शेतक-यांच्या शेतजमीनीस वाढीव किंमत मिळावी, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मंद्रूपच्या अप्पर तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. BJP marches on Mandrup tehsil office to demand farmers
तसे मागण्याचे निवेदन दिले. या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी दिला. या मोर्चामध्ये दक्षिणचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी उपस्थित होते.
यावेळी शेतीपंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा, भिमा नदीकाठच्या गावांमधील मंद्रुप एम. आय. डी. सी. साठी अधिग्रहित करण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतजमीनीस वाढीव किंमत मिळावी, ८ तास वीज पुरवठा करण्यात यावा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे, कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना परत कर्ज वाटप करण्यात यावे, भिमा नदीकाठावरील गावांमध्ये मदत व पुनर्वसन विभागाकडून बोटींची सोय करावी,
https://www.facebook.com/109399567404448/posts/534465131564554/
अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ मिळावी, कॅनॉलला टेलएंड पर्यंत पाणी सोडण्यात यावे, सिना नदीला पाणी टेलएंड पर्यंत सोडावे, अतिवृष्टी प्रलंबित अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतांकडे जाणाऱ्या रस्त्यांना निधी उपलब्ध करून देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या.
या मागण्या त्वरित मान्य न झाल्यास भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी रामप्पा चिवडशेट्टी, हनुमंत कुलकर्णी, मळसिद्ध मुगळे, प्रशांत कडते, कलावती खंदारे , यतीन शहा व तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
□ महाआघाडीला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही
सध्याचे महाआघाडी सरकार शेतकऱ्यांवर वारंवार अन्याय करत आहे. भाजपच्या काळात असे प्रकार होत नव्हते. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. आमच्या सर्व मागण्या सरकारने मान्य कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर होणाऱ्या परिस्थितीस सरकार जबाबदार असेल, असा इशारा आमदार सुभाष देशमुख यांनी दिला.
https://www.facebook.com/109399567404448/posts/534466734897727/