□ भोंग्यावरून राजकारण होणाऱ्या राज ठाकरेंवर ही केली टीका
सोलापूर : शरद पवार यांच्याबरोबर आपण काम केले आहे. ते व्यक्तिगत जातीवादी नाहीत. मात्र राष्ट्रवादीचे नेते जातीयवादी आहेत. अशा नेत्यांना शरद पवार यांनी आवरावे, अशी अपेक्षाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सोलापुरात व्यक्त केली. Sharad Pawar is not a racist but NCP leaders argue about caste: Ramdas Athavale
केंद्रीय मंत्री आठवले हे सोलापूर दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांनी सुरू केलेल्या भोंग्याचा राजकारणावरही टीका केली. राज ठाकरे हे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत असल्याचा आरोपही केला.
रामदास आठवले म्हणाले की, मशिदीवरील भोंगे उतरवावे, असा न्यायालयाने आदेश कधीच दिलेला नाही. फक्त ते आवाजाची मर्यादा ठरवून दिलेली आहे. मात्र राज ठाकरे त्यावर राजकारण करत आहेत. मंदिरावर भोंगे जरूर लावा. मात्र मशिदीसमोर हनुमान चालीसा म्हणणे याला आमचा विरोध आहे. यामुळे हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. राज ठाकरे हे नेहमी आपला राजकारणाचा रंग बदलत असतात या वेळी त्यांनी भगवा रंग का घेतला हे समजलेले नाही. मात्र या राजकारणाचा त्यांना कोणताही फायदा होणार नाही असेही आठवले म्हणाले.
शरद पवार हे जातीयवादी नेते नाहीत. मात्र त्यांच्या पक्षात असलेले अमोल मिटकरी यांच्यासारखे अनेक नेते जातीवादी आहेत. दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य करत आहेत. अशा नेत्यांना पवारांनी आवरावे असा सल्लाही आठवले यांनी दिला.
ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण यामध्ये बाजू मांडण्यात सरकार कमी पडले आहे. त्यामुळे या दोन्ही समाजाच्या आरक्षण गेले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/534314518246282/
या शिवाय दलित समाजावर आज वारंवार अत्याचार होत आहे तसेच केंद्राने सांगूनही राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यास तयार नाहीत. हे सरकार सर्वच बाबतीत आपले ठरले आहे. त्यांना जर राज्य करता येत नसेल तर त्यांनी सत्ता सोडून द्यावी, अशी आठवले यांनी मागणी केली.
या सरकारमध्ये काँग्रेसचा वारंवार अपमान होत आहे. त्यांच्या आमदारांना निधी दिला जात नाही. काँग्रेसने अपमान सहन करू नये त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे असेही आठवले म्हणाल. जर हे सरकार पडले तर भाजप आणि महायुती मिळून सरकार निश्चित बनवेल, असेही आठवले यांनी सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/533970334947367/