अहमदनगर : येथे नागपूर मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून 4 गंभीर जखमी आहेत. कोपरगाव तालुक्यातील डाऊच शिवारात कंटेनरची रिक्षाला धडक बसल्याने अपघात झाला आहे. सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला. Container – Seven killed, 4 seriously injured in rickshaw collision
या धडकेत सात जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महाविद्यालयीन तरुणी, तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. अपघातानंतर गाडीसह पसार झालेल्या कंटनेर चालकाला नागरिकांनी पकडू पोलिसांच्या ताब्यात दिलं. दर्शन सिंह असं कंटेनर चालकाचं नाव असून तो लुधियाणा इथला रहिवासी आहे.
कंटेनरने समोरुन येणाऱ्या मोटारसायकलला कट मारुन प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. रिक्षातून प्रवास करणाऱ्या कॉलेजच्या दोन विद्यार्थिनी, दोन महिला आणि दोन पुरुषांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एका जखमी महिलेचे उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. रिक्षातील प्रवाशांसह मोटारसायकलवरील तिघे असे एकूण सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे.
या कंटेनरने दोन मोटरसायकलस्वारांना देखील चिरडले आहे. ते देखील गंभीर जखमी झाल्याचे समजते. दरम्यान या घटनेनंतर परिसरात गर्दी जमली होती. नागरिकांनी त्वरित त्याठिकाणी मदतकार्य केली.
राजाबाई साहेबराव खरात (वय 60वर्षे रा. चांदेकसारे), आत्माराम जम्मानसा नाकोडे (वय 65 वर्षे रा. वावी), पूजा नानासाहेब गायकवाड (महाविद्यालयीन विद्यार्थिनी, वय 20 वर्षे रा. हिंगणवेढे), प्रगती मधुकर होन (महाविद्यालयीन विद्यार्थिनी, वय 20 वर्षे रा. चांदेकसारे), शैला शिवाजी खरात (वय 42 वर्षे रा.श्रीरामपूर) शिवाजी मारुती खरात (वय 52 वर्षे, रा. श्रीरामपूर) , रुपाली सागर राठोड (वय 40 वर्षे रा. सिन्नर) असे सात मृतांची नावे आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/535141901496877/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
विलास साहेबराव खरात (वय 34 वर्षे रा. चांदेकसारे), कावेरी विलास खरात (वय 5 वर्षे, रा चांदेकसारे), धृव सागर राठोड (वय 17 वर्षे, रा.सिन्नर) मोटारसायकलवरील जखमी, मोटार सायकलवरील दिगंबर चौधरी (वय 42 वर्षे), त्यांचा मुलगा सर्वेश दिगंबर चौधरी (वय 12 वर्षे), बहीण कृष्णाबाई गोविंद चौधरी (वय 42 वर्षे, रा. पोहेगाव) अशी जखमींची नावे आहेत.
□ अहमदनगरमध्ये तरुणाची हत्या
अहमदनगमधील देवगाव शिवारात तरुणाची हत्या केल्याचे समोर आले आहे. योगेश भास्कर भालेराव (वय 27) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
योगेश भास्कर भालेराव (वय 27) हा शेंडीला जात असताना त्याला रस्त्यात अडवून रमेश दत्तू जाधव व मधुकर दत्तू जाधव यांनी देवगाव शिवारात मारुन टाकल्याची फिर्याद राजूर पोलिस ठाण्यात दिली आहे. मयत मुलाचे वडील भास्कर संतू भालेराव यांनी सदर फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीवरून राजूर पोलिसांत भा.द.वि.कलम 302,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही दिवसांमध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी ही पोलिसांसमोर आव्हान बनत चालली आहे. चोरी , दरोडे आदी घटनांनी नागरिक आधीच त्रस्त असतानाच आता हत्येसारख्या घटना घडू लागल्याने नागरिकही चिंतेत असल्याचे वृत्त आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/535139741497093/