पंढरपूर : पंढरपूर शहरालगत असलेल्या भिमानदीच्या तीरावर अज्ञात महिलेने स्वत:च्या मुलाला मारुन स्वत: झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना आज शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. Mother strangles child in Pandharpur; Excitement in the area
या दोन्ही अनोळखी व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरु असल्याची माहिती पंढरपूर तालुका पोलीस निरीक्षक मिलींद मोहिते यांनी दिली. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत असलेल्या महिलेच्या अंगावर जुने भाजलेले व्रण आहेत. सदर महिलेचे (वय 35 वर्षे) तर मुलाचे ( वय 10 वर्षे) आहे. मृत महिला व मुलगा अज्ञात असून सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात मिसिंग व्यक्ती कोण आहेत का याची चौकशी सुरु आहे. या आत्महत्येच्या घटनेचे कारण समजले नाही. घटनेचा पुढील तपास पंढरपूर तालुका पोलिस करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/535141901496877/
■ अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी
》 ११ महिन्यांत निकाल, पीडितेस दोन लाखांची भरपाई
सोलापूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली. लिंगराज नागेश गणप्पा (वय २५, रा. चाकोते नगर, विडी घरकुल) असे आरोपीचे नाव आहे.
२६ जून २०२१ रोजी आरोपीच्या दुकानात अत्याचाराची घटना घडली होती. पीडित मुलगी बडीशेप घेण्यासाठी दुकानात आली होती. ती १५ ते २० मिनिटे झाली तरी घरी न परतल्याने आजीने दुकानाकडे येऊन मुलीला आवाज दिला. त्यावेळी आरोपी लिंगराज मुलीला बाहेर घेऊन आला. मुलगी घाबरलेली दिसत असल्याने आजीने विचारणा केली. मुलीने अत्याचार झाल्याचे सांगितले. त्यानंतर मुलीच्या आईने एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. ए. मोरे यांनी केला. ११ ऑगस्ट २०२१ रोजी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोप दाखल केले.
विषेश न्यायाधीश श्रीमती यु.एल. जोशी यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे ८ साक्षीदार तपासण्यात आले. अॅड. प्रकाश जन्नू यांनी बाजू मांडली. पीडिता ही घटनेच्या वेळी अल्पवयीन होती. आरोपीला हे माहीत असूनही त्याने मुलीवर अत्याचार केल्याचे
वकिलांनी साक्ष व पुराव्याच्या आधारे निदर्शनास आणून दिले. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४ (२) अन्वये आरोपीस दोषी धरण्यात आले. त्याला २० वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्याची शिक्षा सुनावली. पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या योजनेतून दोन लाख रुपये देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. घटनेच्या ११ महिन्याच्या आत पीडितेस व तिच्या कुटुंबास न्याय मिळाला. आरोपीच्या वतीने ॲड. हेमंतकुमार साका यांनी काम पाहिले.
□ पीडितेस दोन लाखांची भरपाई
सुनावणी जलदगतीने होऊन घटनेच्या ११ महिन्याच्या आत विशेष न्यायालयाने निकाल देऊन एकप्रकारे पीडितेस व तिच्या कुटुंबीयास लवकर न्याय दिला आहे. पीडितेस नुकसान भरपाई म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या योजनेतून दोन लाख रुपये देण्याचा आदेश विशेष न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी दिला आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/535239891487078/