सांगली : सांगलीत लाचलुचपत विभागाने मोठी कारवाई केली आहे. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचा शिक्षण अधिकारी आणि अधीक्षकास लाच घेताना लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले आहे. पदवीधर श्रेणीत मान्यता मिळवून देण्यासाठी त्यांनी 3 शिक्षकांकडे प्रत्येकी 60 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. 1 लाख 70 हजार स्विकारताना लाचलुचपत पथकाने त्यांना ताब्यात घेतले. While accepting the bribe, the education officer and the superintendent were caught red handed
तीन शिक्षकांकडून पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळवून देण्याच्या बदल्यात प्रत्येकी 60 हजार रूपये प्रमाणे लाचेची मागणी या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. शिक्षणाधिकारी विष्णू मारूतीराव कांबळे (वय ५८) व त्याच विभागातील अधीक्षक विजयकुमार अशोक सोनवणे (४१) अशी दोघांची नावे आहेत. 1 लाख 70 हजार रूपयांची लाच स्विकारताना सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने काल शुक्रवारी रात्री दोघांना लाचेच्या रकमेसहीत पकडले.
शिक्षण अधिकारी विष्णू कांबळे यांनी सोलापूर महापालिकेत शिक्षण विभागात प्रशासनाधिकारी म्हणून काम केले आहे. या ठिकाणी चांगली कामगिरी केल्याची माहिती आहे.
दोघांवर विश्रामबाग पोलीस स्टेशन मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल झालाय. आत्तापर्यंतची सांगली जिल्हा परिषदेतील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
तक्रारदार व त्यांचे दोन शिक्षक मित्र यांचे पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळण्याबाबत प्रस्ताव शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, सांगली यांच्याकडे दिला होता. सदरचे काम करून देण्यासाठी शिक्षण अधिकारी कांबळे व अधीक्षक सोनवणे यांनी तक्रारदार व त्यांचे शिक्षक मित्र यांचेकडे प्रत्येकी 60 हजार रूपये प्रमाणे लाचेची मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी 26 एप्रिल रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/535873601423707/
दिलेल्या तक्रारीनुसार अॅन्टी करप्शन ब्युरोने पडताळणी केली असता त्यामध्ये शिक्षण अधिकारी कांबळे व अधीक्षक सोनवणे यांनी लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कांबळे, शिक्षण अधिकारी व सोनवणे, अधीक्षक यांच्याविरूध्द जिल्हा परिषद कार्यालय सांगली तसेच कांबळे यांच्या राहत्या घराजवळ सापळा लावला आणि 1 लाख 70 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले.
शिक्षण अधिकारी कांबळे व अधीक्षक सोनवणे 1 लाख 70 हजार रूपयांची लाच स्विकारताना सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने काल रात्री दोघांना लाचेच्या रकमेसहीत पकडले आहे.
□ रात्री घरासमोर लावला सापळा
जिल्हा परिषद आणि शिक्षणाधिकारी कांबळे याच्या घरासमोर सापळा लावला. तसेच सोनवणे याच्या कुपवाडमधील अहिल्यानगर येथेही सापळा रचण्यात आला होता. तक्रारदार यांनी सोनवणे याच्याकडे एक लाख सत्तर हजारांची रक्कम दिली. त्यानंतर शिक्षणाधिकारी कांबळे याच्या विश्रामबाग येथील कल्पतरू संकल्प सोसायटी येथे ही रक्कम दिल्यानंतर दोघांनाही रंगेहात कांबळे याच्या घरी पकडण्यात आले.
या दोघांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. कारवाईत लाचलुचपतचे उपाधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, अंमलदार अविनाश सागर, प्रितम चौगुले, धनंजय खाडे, सलिम मकानदार, सिमा माने, संजय संकपाळ, सजय कलगुटगी, रविंद्र धुमाळ, राधिका माने, भास्कर भोरे यांचा सहभाग होता.
https://www.facebook.com/109399567404448/posts/535746551436412/