मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे मन्नतमध्ये ग्रँड सेलिब्रेशन करण्यात आलं. या पार्टीत अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. भारतासह संपूर्ण जगात सांस्कृतिक दृष्ट्या शाहरुखचे योगदान खूप मोठे आहे. त्याच्या याच योगदानामुळे त्याला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे. King Khan received France’s highest civilian award
या निमित्ताने मन्नतमधे एका जंगी पार्टीचे आयोजनही केले होते. शाहरूखने ‘मन्नत’ म्हणजेच त्याच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पार्टीमधे परदेशातील काही खास पाहुण्यांनी हजेरी लावली आहे.या पार्टीमध्ये फ्रान्स, कॅनडा तसेच इतर देशांमधील राजदूत उपस्थित होते. या पार्टीमधील फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहेत. त्यांच्यासोबतचा एक ग्रुप फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
फ्रान्सचे भारतीय राजदूत ‘Mr. Jean-Marc Séré-Charlet’ यांनी मन्नतमधे पार पडलेल्या पार्टीनंतर एक ट्विट करत शाहरुखचं कौतुक केलं आहे.”फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार शाहरुख खानला देणं अगदी योग्य आहे. शाहरुख तू दिलेल्या पार्टीबद्दल तुझे मनापासून आभार.” अशाप्रकारचं ट्वीट करत शाहरूखसोबतचा एक फोटो ट्वीटरवर शेअर केलाय.
I understand the charm ✨that King Khan @iamsrk has on audiences across the🌏.
Thank you Shukriya @iamsrk & @gaurikhan for your warm welcome.🙏😊
I look fwd to further strengthen ties & new co-production opportunities between Bollywood and the 🇨🇦 Film Industry. pic.twitter.com/gVNNrb2lB1— Diedrah Kelly (@DiedrahKelly) May 6, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
बॉलिवूडचा किंग खान आणि 90 च्या शतकातील सुपरहिरो शाहरुख खान आजही अनेक कारणांसाठी चर्चेत असतो. यावेळी शाहरूख एका हायप्रोफाईल पार्टीमुळे चर्चेत आला आहे. अलीकडे शाहरूखनने त्याच्या मुंबईतील ‘मन्नत’ या बंगल्यावर काही देशांच्या राजदूतांसाठी एका हाय प्रोफाईल पार्टी पार पडली.
फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये सांस्कृतिक दृष्ट्या शाहरुखने दिलेल्या योगदानासाठी त्याला या पुरस्काराने गौरवण्यात आलं. कॅनडाचे भारतातील राजदूत ‘Diedrah Kelly’यांनी देखील ट्वीट करत शाहरुखचं कौतुक केलेलं दिसते.३ मे रोजी ताजमहाल पॅलेस या हॉटेलमध्ये शाहरुखला या पुरस्काराने गौरवण्यात आलं.
कॅनडाचे भारतातील राजदूत Diedrah Kelly यांनी या पार्टीचे अनेक फोटो ट्विटवर शेअर केले आहेत. यावेळी Kelly यांनी मन्नतवर झालेल्या स्वागताचे तोंड भरून कौतुक केले आहे. यावर kelly यांनी लिहिले की, जगभरातील चाहत्यांना शाहरूख किती आवडतो याची मला जाणीव आहे. दरम्यान आमचं मन्नतवर प्रेमाने स्वागत केल्याबद्दल गौरी खान आणि शाहरुख खानचे मनापासून आभार. मला बॉलिवूड आणि कॅनडा फिल्म इंडस्ट्रीचा अभिमान आहे.. या इंडस्ट्रीमध्ये नवीन संधी निर्माण होतील अशी पेक्षा व्यक्त करते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/535873601423707/