□ रिलायन्समार्केट जवळ दिवसा तलवार – कुर्हाडीने मारहाण
सोलापूर – पुण्याहून आलेल्या विवाहित तरुणाची सोलापुरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना शेळगी परिसरात घडली. A married youth from Pune committed suicide by hanging himself in Solapur
घटनेच्या आदल्या दिवशी पुण्याहून सोलापुरात आईला भेटण्यासाठी आलेल्या बसवराज सुधाकर बनसोडे (वय ३० रा. हौसेकरवस्ती वस्ती, शेळगी) या विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शेळगी परिसरातील बाळशेट्टी यांच्या शेतात आज शनिवारी (ता. 7) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
बसवराज बनसोडे हा पुणे येथे ड्रायव्हर म्हणून काम करीत होता. गुरुवारी रात्री तो पत्नी आणि मुलासोबत सोलापुरात आईला भेटण्याकरिता आला होता. शुक्रवारी रात्री तो घरातून गेला तो परतला नाही. आज सकाळी त्याचा मृतदेह घरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बाळशेट्टी यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला सुती दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची नोंद जोडभावीपेठ पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार दुधाळ पुढील तपास करीत आहेत.
□ रिलायन्स मार्केटजवळ दिवसा तलवार आणि कुर्हाडीने मारहाण; तिघे जखमी
सोलापूर – व्याजाने घेतलेल्या पैशाच्या वादातून दोन गटात तलवार विळा, चाकू आणि कुर्हाडीने केलेल्या मारहाणीत तिघेजण जखमी झाले. ही घटना गुरुवारी (ता. 4) दुपारी दमाणी नगर परिसरातील रिलायन्स मार्केटजवळ घडली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/535918178085916/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
नवज्योत प्रभाकर तुपारे (वय ३२) त्याचा भाऊ स्नेह तुपारे (वय ३० रा.दमानी नगर, न्यू लक्ष्मी पेठ) अशी पहिल्या गटातील जखमींची नावे आहेत. दुपारी १२ वाजेच्या सुमारास ते दोघे रिलायन्स मार्केट जवळील चहाच्या टपरीजवळ थांबले होते. त्यावेळी अनोळखी १० ते १५ जणांनी त्यांना तलवार विळा आणि रॉडने मारहाण केली.
तर दुसर्या गटातील आकाश बाबू मुदगल (वय २५ रा. साठेपाटील वस्ती) असे जखमीचे नाव आहे. त्याला व्याजाचे पैसे देण्याच्या कारणावरून सय्या तुपारे आणि अन्य तिघांनी चाकू आणि कुऱ्हाडीने मारहाण केली, अशी नोंद फौजदार चावडी पोलिसात झाली आहे .
□ वरकुटे येथे अपघात, रिक्षामधील चौघे जखमी
सोलापूर – पुणे महामार्गावरील वरकुटे येथे मोटारीच्या धडकेने रिक्षा मधील ४ प्रवासी जखमी झाले. हा अपघात गुरुवारी (ता. 5) पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडला. सर्व जखमींना इंदापूर येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी प्रवासी पुणे ते सोलापूर असा रिक्षातून प्रवास करीत होते.
विशाल बीजवाड (वय ४० रा. सिंहगड रोड,पुणे) हनुमंत गायकवाड (वय ६०) त्यांची पत्नी शकुंतला (वय ५० रा. पिंपरी चिंचवड )आणि दिव्या गायकवाड (वय १३ रा. बेलाटी ता.उत्तर सोलापूर) अशी जखमींची नावे आहेत. ते सर्व जण रिक्षातून पुणे ते सोलापूर असा प्रवास करीत होते. इंदापूर नजीक असलेल्या वरकुटे गावाजवळ पाठीमागून मोटार धडकल्याने हा अपघात घडला.
https://www.facebook.com/109399567404448/posts/535891041421963/