● बार्शीत उसाच्या ट्रॅक्टरने दिली धडक, एक ठार एक जखमी
विरवडे बु : कामती बु (ता. मोहोळ) येथे शुक्रवारी (ता. 6) भर दुपारी दोन वाजता अचानक रस्त्याच्या कडेला वाळलेले गवत पेटले. वाऱ्यामुळे आग भडकली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना लागली. बघता बघता आगीने पेट घेतला. बघ्याची गर्दी झाली. The sun set on fire in Kamati; The tempo on the side of the road ignited
ही वाहने कामती पोलिसांनी वाळू वाहतूक करताना कारवाई करून जप्त केलेली आहेत. वर्षानुवर्षे ही वाहने रस्त्याच्या कडेला लावलेली आहेत. त्या वाहनाच्या अवतीभवती सर्व गवत व झुडपे उगवली आहेत. त्यामुळे वाहनांना आग लागून दोन टेम्पो जळून खाक झाले आहेत. आग लागल्याची माहिती मिळताच कामती पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
शेजारील खताच्या दुकानातून नळ चालू करून नागरिकांच्या साह्याने पाणी ओतून आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाऱ्यामुळे आगीच्या झळा नागरिकांना दूर लोटत होत्या. दरम्यान आग लागलेल्या ठिकाणापासून कामती चौक जवळच आहे. चौकात अनेक मोठमोठी दुकाने आहेत. आग जर पसरत गेली असती तर खूप मोठे नुकसान झाले असते. मोकळ्या परिसरात ही आग नेमकी कशी लागली याचा पोलीस शोध घेत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/535935084750892/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ ऊसाच्या ट्रॅक्टरच्या धडकेत एक ठार एक गंभीर जखमी, अज्ञात ट्रॅक्टर चालका विरोधात गुन्हा दाखल
बार्शी : बार्शी तालुक्यातील हळदुगे येथे शेतात पाणी देण्यास चाललेल्या दोघांना ऊसाचे ट्रॅक्टरने धडक दिल्याने एकजण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला असुन याप्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात वैराग पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
दादासाहेब श्रीमंत नलवडे ( रा. हळदुगे) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात हणुमंत राजाराम काटे (वय ५९ रा. हळदुगे) हे जागीच ठार झाले तर दिनकर तुकाराम मोहिते (वय ५० रा. हळदुर्गे ता. बार्शी ) हे गंभीर जखमी झाले.
हनुमंत काटे व दिनकर मोहिते रात्री साडेआठ वाजता शेताला पाणी देऊन येतो असे घरी सांगून गेले. परंतु ते शेतात जाण्याऐवजी मोटारसायकल क्रमांक एम.एच. १३ एन. एच. २११० या वरून उपळे गावाकडे चालले होते. रस्त्यात मकरंद बाबासाहेब रोटे यांचे शेताचे जवळ समोरून आलेल्या ऊस भरलेल्या लाल रंगाच्या ट्रॅक्टरने (आर. टी. ओ. क्रमांक माहीत नाही) त्याच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली.
यामध्ये काटे हे जागेवर ठार झाले तर दिनकर मोहिते हे गंभीर जखमी झाले. या अपघातात काटे यांच्या मृत्यूस व मोहितेंना गंभीर इजा करण्यास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात ट्रॅक्टरचालकाविरोधात सदर अपघाताची माहिती न देता, जखमींना वैदकीय मदत न पुरविता पळून गेला म्हणुन गुन्हा दाखल झाला आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महारूद्र परजणे हे करत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/535873601423707/