● शीतलदेवी मोहिते – पाटील यांची घोषणा
अकलूज : पुरुषांच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेप्रमाणेच राज्यात प्रथमच अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलावर मॅटवरील ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेचे ३ , ४ व ५ मे २०२३ रोजी आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती ताराराणी महिला कुस्ती केंद्राच्या प्रमुख शीतलदेवी मोहिते – पाटील यांनी दिली. Akluj will host the first women’s saffron wrestling tournament in the state
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शंकरनगर – अकलूज येथील ऐतिहासिक शिवतीर्थ आखाड्यावर पुरुष व महिलांच्या राज्यस्तरीय मातीतील कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
यावेळी शीतलदेवी मोहिते – पाटील म्हणाल्या की, राज्य कुस्तीगीर परिषदेकडे गेल्या दोन वर्षापासून आम्ही महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्या म्हणून पाठपुरावा करीत आहोत. परंतु त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. अकलूजला कुस्तीची मोठी परंपरा आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील व मदनसिंह मोहिते पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून कुस्ती जपली व जोपासली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/536634554680945/
दोन महाराष्ट्र केसरी मल्ल महाराष्ट्राला दिले. अलीकडे या क्षेत्राकडे महिलाही मोठ्या प्रमाणात आकर्षिल्या जात आहेत. अकलुजला महिलांसाठी अद्ययावत ताराराणी महिला कुस्ती केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून पुढील वर्षी ३ , ४ व ५ मे २०२३ रोजी ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
प्रथम क्रमांकासाठी रु . एक लाख रोख पारितोषिक , चांदीची गदा व हिरो प्लेजर दुचाकी गाडी देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी रु. ७५ हजार रोख , तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी रु. ५० हजार विभागून देण्यात येणार आहे . प्रथम फेरीपासून बाद होणाऱ्या खेळाडूस पारितोषिके दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच वरीष्ठ गट , १७ व १५ वर्षाखालील वजन गटातील स्पर्धाही खेळविल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील , जयसिंह मोहिते पाटील , मदनसिंह मोहिते पाटील , आमदार रणजितसिंह मोहिते पाटील , आमदार राम सातपुते , माजी आमदार नारायण पाटील, धैर्यशील मोहिते पाटील , अर्जुनसिंह मोहिते पाटील , संजय आवताडे , सत्यप्रभादेवी मोहिते पाटील , वैष्णवीदेवी मोहिते पाटील , देवश्रीदेवी मोहिते पाटील , दिग्विजय बागल , पै . रावसाहेब मगर , महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर यांच्यासह राज्यातील नामवंत ज्येष्ठ मल्ल व हजारो कुस्ती शौकीन उपस्थित होते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/536636378014096/