● दोन दिवसात येणार अहवाल : पदस्पर्श दर्शनाचा निर्णय बैठकीत होणार
पंढरपूर : देशभरातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल – रुक्मिणी मंदिरातील रुक्मिणी मातेच्या मूर्तीची चरण झीज झाली आहे. नुकतेच विधानसभेचे उपसभापती निलम गो-हे यांनी देखील भेट देवून पाहणी केली होती. यानंतर आज रविवारी पहाटे औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिका-यांनी पाहणी केली. Archaeological Department inspects the statue of Vitthal-Rukmini
पुरातत्व विभागाने पाहणी केलेला अहवाल येत्या दोन दिवसात येणार आहे. पुरातत्व विभागाच्या अहवालाचे तंतोतंत पालन करण्यात येईल, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तिसह परिवार देवतांच्या मूर्तीचा संवर्धन करणं हे मंदिर समितीचे आद्य कर्तव्य आहे . मूर्ती संवर्धनासाठी श्री विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद करणे, हा विषय पुरातत्व विभागाचा व मंदिर समितीचा नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/536598804684520/
पदस्पर्श दर्शन सुरु ठेवून कश्याप्रकारे मूर्ती संवर्धन करता येईल यावर मंदिर समिती व पुरातत्व विभाग निर्णय घेईल. मात्र पदस्पर्श दर्शन बंद करण्याबाबत मंदिर समिती व संपूर्ण वारकरी संप्रदायची बैठक घेतल्याशिवाय बोलणे आयोग्य आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पत्रकारांना दिली.
□ श्री विठ्ठलाची मूर्ती व्यवस्थित
श्री विठ्ठल रूक्मिणी मूर्तीची झीज या पाठीमागे नित्योपचार, अभिषेक, पदस्पर्श दर्शन , गर्भगृहाची रचना तेथील तापमान या गोष्टी कारणीभूत आहे. परंतु श्री विठ्ठलाची मूर्ती व्यवस्थित आहे. श्री रूक्मिणी मातेच्या मूर्तीला दोन तीन दिवसात व्यवस्थित पुन्हा रासायनिक लेपन पुन्हा करावे लागणार आहे. पहाटे मंदिरात जाऊन श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या मूर्तीची पाहणी केली. याचा अहवाल सादर करणार आहे.
– श्रीकांत मिश्रा, भारतीय पुरातत्व विभाग , औरंगाबाद
● आषाढी वारीची घोषणा; दोन वर्षांनंतर यंदा मोठ्या थाटामाटात आषाढी वारी भरणार
पुणे : आषाढी वारीची घोषणा आज करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख सोहळा ‘आषाढी वारी पालखी सोहळ्या’चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 20 जून रोजी संत तुकाराम महाराज पालखी तर 21 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. दोन वर्षांनंतर यंदा मोठ्या थाटामाटात आषाढी वारी साजरी होणार आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्यात 329 दिंड्या सहभागी होणार आहेत. 9 जुलैला ही वारी पंढरपुरमध्ये दाखल होणार आहे. तर 10 जुलैला आषाढी एकादशी साजरी करणार आहेत. तसेच आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही 21 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/536401294704271/