● दोन वर्षांनंतर यंदा मोठ्या थाटामाटात आषाढी वारी
पुणे : आषाढी वारीची घोषणा आज करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख सोहळा ‘आषाढी वारी पालखी सोहळ्या’चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 20 जून रोजी संत तुकाराम महाराज पालखी तर 21 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. दोन वर्षांनंतर यंदा मोठ्या थाटामाटात आषाढी वारी साजरी होणार आहे. Announcement of Ashadhi Wari; On this day, the palanquin will leave for Pandharpur
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्यात 329 दिंड्या सहभागी होणार आहेत. 9 जुलैला ही वारी पंढरपुरमध्ये दाखल होणार आहे. तर 10 जुलैला आषाढी एकादशी साजरी करणार आहेत. तसेच आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही 21 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
देहू संस्थांनने आषाढी वारीची घोषणा केली आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरीकडे प्रस्थान करणार आहे. यंदा पालखी पुणे आणि इंदापूर मध्ये दोन दिवसांच्या मुक्कामी असणार आहे.पायी प्रवास पूर्ण करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचणार असून 10 जुलैला आषाढी एकादशी आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून 21 जूनला प्रस्थान करणार आहे.
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची घोषणा आज (रविवारी) झाली. यंदा पालखी सोहळा देहूतून 20 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. कोरोना ओसरल्यामुळे सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी होणार आहेत. आषाढी वारीची घोषणा झाल्यामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
कोरोनामुळे दोन वर्षे वारकऱ्यांना पायी वारीत सहभागी होता आले नाही. मात्र, परंपरेत खंड न पडू देता मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला. दोन वर्षांनंतर यंदा मोठ्या थाटामाटात आषाढी वारी साजरी करण्यासाठी वारकरी उत्सुक आहेत. आषाढी वारीची गावागावात वारकऱ्यांकडून तयारी सुरू झाली आहे. आता या सर्वांना संत तुकाराम तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाची आणि विठोबाच्या चरणी माथा टेकविण्याची आस लागली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
》 संत तुकाराम महाराज पायी पालखी सोहळा (देहू ते पंढरपूर)
सोमवारी (20 जून) संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान होईल. याच दिवशी रात्रीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात होईल. 21 जून आकुर्डी विठ्ठल मंदिर, 22 आणि 23 जूनला निवडुंगा विठ्ठल मंदीरात (नानापेठ, पुणे) मुक्काम असेल, 24 जूनला लोणी काळभोर, 24 जून यवत, 25 जून वरवंड, 27 जून उंडवडी गवळ्याची, 28 जून बारामती, 29 जून सणसर, 30 जूनला आंथर्णे, 1 जुलै निमगाव केतकी, 2 जुलै इंदापूर, 4 जुलै सराटी, 5 जुलै अकलूज, 6 जुलै बोरगाव, 7 जुलै पिराची कुरोली गायरान, 8 जुलै वाखरी तळ येथे मुक्काम असतील. 9 जुलैला पालखी दुपारी एकनंतर पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. 10 जुलैला पंढरपूरला नगरप्रदक्षिणा केल्यानंतर 13 जुलै दुपार पर्यंत पालखी सोहळा मुक्काम श्री संत तुकाराम महाराज मंदिर प्रदक्षिणा मार्ग, पंढरपूर येथे राहिल. त्यानंतर परतीचा प्रवास सुरू होईल.
》 संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी सोहळा (आळंदी ते पंढरपूर) –
मंगळवारी (दि. 21 जून) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान होईल. याच दिवशी रात्रीचा पहिला मुक्काम आळंदी येथे दर्शन मंडप इमारत (गांधी वाडा) येथे होईल. 22 आणि 23 जूनला पालखी विठोबा मंदिर भवानीपेठ पुणे, येथे असेल. 24 आणि 25 जून सासवड, 26 जून जेरूरी, 27 जून वाल्हे, 28 आणि 29 जून लोणंद, 30 जून तरडगांव, 1 आणि 2 जुलै विमानतळ फलटण, 3 जूलै बरड, 4 जुलै नातेपुते, 5 जुलै माळशिरस, 6 जुलै वेळापूर, 7 जुलै भंडी शेगाव, 8 जुलै वाखरी, 9,10,11, आणि 12 जुलै पंढरपूर, 13 जुलैला श्रींचे चंद्रभागा स्नान, श्री विठ्ठल रुक्मिणी भेट व गोपाळपूर काला होऊन परतीचा प्रवास सुरु होईल. 13 जुलैला माऊलींच्या पालखीचा मुक्काम वाखरी येथे असेल.