न्यूयॉर्क : ट्वीटरची खरेदी रोखण्यासाठी टेस्लाचे एलन मस्क यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे ट्वीटरची खरेदी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ट्वीटर बाबत एलन मस्क आणि ट्वीटरमध्ये झालेल्या व्यवहाराला 2025 पर्यंत स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्ते फ्लोरिडा पेंशन फंड यांनी केली आहे. दरम्यान, ट्वीटर खरेदीची डील फायनल झाल्यावर टेस्लाचे शेअर्स ढासळले होते. Musk Twitter Deal Petition filed against Alan Musk; Twitter purchase on hold?
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क आता ट्विटरचे मालक होण्याची शक्यता आहे. मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी 43 अब्ज डॉलर्सची ऑफर दिली होती. ही सर्वोत्तम आणि अंतिम ऑफर आहे, असेही मस्क यांनी स्पष्ट केले आहे. खरेदी केल्यानंतर सर्व काही सुरळीत पार पडण्या ऐवजी त्यांच्या अडचणीत अधिकच वाढ होताना दिसत आहे.
एलन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर्सला (३.३७ लाख कोटी रुपये) ट्वीटरची खरेदी केली आहे. या व्यवहारानंतर त्यांनी सांगितले की, आपण फंडची उभारणी करत आहोत. सिकोया कॅपिटल फंड ने ८० कोटी डॉलर, वाय कॅपिटलने ७० कोटी डॉलरची उभारणी केली आहे. ओरॅकलचे सह-संस्थापक लॅरी एलिसन यांनी १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे मान्य केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/536412814703119/
ट्वीटर खरेदीनंतर टेस्लाचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर घसरल्याने मस्क यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. तसेच ट्वीटर खरेदी रोखण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न केले जात आहे. फ्लोरिडा पेंशन फंड यांनी डेलावेअर चान्सरी न्यायालयात ट्वीटरची खरेदी रोखण्यासाठी एलन मस्क आणि ट्वीटर विरोधात याचिका दाखल केली आहे.
ट्वीटर खरेदी बाबत एलन मस्क आणि ट्वीटर यांच्यात झालेला व्यवहार थांबविण्यासाठी फ्लोरिडा पेंशन फंड यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेत हा व्यवहार कमीत कमी २०२५ सालापर्यंत थांबविण्यात यावा असे म्हटले आहे. ट्वीटरमध्ये मस्क हे भाग धारक बनले आहेत. याचिकेनुसार उर्वरीत दोन तृतियांश समभाग मस्क यांच्या मालिकेचे होण्याच्या प्रक्रियेस तीन वर्षांचा अवधी लागण्याची शक्यता त्यामुळे या व्यवहारास २०२५ पर्यंत स्थगिती मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
एलॉन मस्क ट्वीटरचा व्यवहार करण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न करीत आहेत. या वर्षभरात या खरेदी बाबतचा करार पूर्ण होण्याची शक्यता आहे. ट्विटर आणि मस्क यांच्यातील हा करार जगातील आतापर्यंतचा तिसरा सर्वात मोठा व्यवहार आहे. पण, खरेदी व्यवहाराबाबद दाखल याचिकेबाबत अद्याप एलॉन मस्क किंवा ट्वीटर यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
https://www.facebook.com/109399567404448/posts/536401294704271/