बीड : बीडच्या शिरुरमधील आनंद गावात एका अज्ञात व्यक्तीने एका 65 वर्षीय वृध्दाची धारदार शस्त्राने हत्या केली आहे. कुंडलिक विघ्ने असे हत्या झालेल्या वृध्दाचे नाव आहे. त्यांच्या मृतदेहाजवळ पोलीसांनी एक चिठ्ठी आढळून आली आहे. माझ्या बायकोचा खून झाला असून जोपर्यंत बायकोच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी खून करत राहणार, असे चिठ्ठीत लिहिले आहे. या माणसाला शोधण्यासाठी पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले आहे.’ I will continue to kill until my wife’s killers are arrested’
कुंडलिक सुखदेव विघ्ने असं मृत शेतकऱ्याच नाव असून त्यांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या चिठ्ठीमुळे पोलिसांसमोर मारेकर्याला पकडण्याचं आव्हान उभ राहिलं आहे. या खुनाच्या तपासासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत. श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण केले होते. तालुक्यात मागील काही दिवसांत कोणत्याही महिलेचा खून झालेला नाही. चिठ्ठीतून दिशाभूलही करत खुन्याचा प्रयत्न असू शकतो. असं सर्व बाजूंनी तपास सुरू आहे, अशी माहिती शिरुर कासारचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ यांनी दिलीय.
वृद्धाचा खून करून मारेकऱ्याने मृतदेहाजवळ एक चिठ्ठी ठेवली आहे. यामध्ये माझ्या बायकोचा खून झाला असून जोपर्यंत बायकोच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी खून करत राहणार, असं लिहून त्यांने पोलिसांना आव्हानच दिल आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
शेतात आपल्या पिकाची राखण करण्यासाठी गेलेल्या कुंडलिक विघ्ने यांच्यावर अज्ञात मारेकर्याने मध्यरात्री धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कुंडलिक विघ्ने यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी आपले वडील घरी परत का आले नाहीत हे पाहण्यासाठी त्यांचा मुलगा शेतात गेला असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह त्यांनं पाहिला आणि घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली.
गावकरी आणि पोलीस तात्काळ घटनास्थळावर गेल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणचा पंचनामा केला. यावेळी मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळून आली आहे. माझ्या बायकोचा खून झाला असून जोपर्यंत माझ्या बायकोच्या मारेकर्यांना अटक होत नाही तोपर्यंत खुनाचं सत्र सुरूच राहील असा मजकूर या चिठ्ठीमध्ये लिहिलेला आहे.
मारेकर्यानं या चिठ्ठीमध्ये त्याच्या बायकोचा खून करण्यासाठी ज्यांनी-ज्यांनी सुपारी दिली त्यांच्या नावाचा उल्लेख केला असून त्यांना तात्काळ पोलिसांनी अटक करावी अशी विनंती केली आहे. तर लवकरच पत्रकार परिषद घेऊन पोलीस अधीक्षकांची आणि गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं देखील त्यांनं चिठ्ठीत नमूद केलंय. या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून बीड पोलिसांची दोन पथकं या आरोपीला पकडण्यासाठी रवाना झाली आहेत.