जालना : कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठं विधान केलं आहे. जून, जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट येऊ शकते असं राजेश टोपे म्हणाले आहेत. ‘जून, जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट जास्त जीवघेणी ठरत असल्याचं वाटलं तर लसीकरणच तारणहार असणार आहे. लसीकरणाचं प्रमाण वाढवणं महाराष्ट्रासमोर महत्वाचं काम असणार आहे, असंही ते म्हणाले. Fourth wave of corona will come, health department will take re-examination: Rajesh Tope’s big statement
लसीकरणाचं प्रमाण वाढवणं हेच महाराष्ट्राच्या समोरचं महत्त्वाचं काम असल्याचं सांगत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चौथ्या लाटेपासून सावध राहण्यासाठी पुन्हा एकदा लसीकरणाचं आवाहन केलं आहे. आरोग्य विभाग लसीकरणाबाबत सजग आणि जागरुक राहून काम करत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राजेश टोपे जालन्यात बोलत होते.
लसीकरणात अजिबात सहकार्य न करणाऱ्या लोकांपर्यत जाणीवपूर्वक पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं. ते म्हणाले की, “लसीकरणाबाबत रिफ्युजल टेन्डेन्सी काही लोकांची असते, जे नाही म्हणतात, येत नाहीत किंवा सहकार्य करत नाहीत, अशा लोकापर्यंत जाऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. या टेन्डेन्सीमुळे 18 ते 60 वर्षे वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचं प्रमाण कमी दिसतं. त्याबाबतीतही जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.”
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/537887774555623/
“शाळकरी विद्यार्थ्यांच्या वयोगटातील लसीकरणात जालना जिल्ह्याने चांगलं काम केलं आहे,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं. “या कामासाठी मी जालन्याचे जिल्हाधिकारी, सीईओ, आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी यांचं अभिनंदन करेन. शिक्षकांचंही अभिनंदन करेन कारण शाळेमध्ये जाऊन त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या आहेत,” असं ते म्हणाले.
राज्यात सध्या मास्क सक्ती नसली तर मास्क वापरण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. “पुढील काळात जर कोरोना संसर्ग कमी होत असल्याची सकारात्मक आकडेवारी आली तर मास्क संदर्भातील पुढील निर्णय घेतला जाईल,” असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
गेल्या महिन्यात राज्यात आणि देशात कोरोनाचे रुग्ण अचानक वाढायला सुरुवात झाली होती. महाराष्ट्र सध्या मास्क मुक्त आहे, परंतु कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे राज्यात पुन्हा मास्क सक्ती करावी लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे सरकारकडून मास्क वापरण्याचं आवाहन केलं जात आहे.
मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे याठिकाणी थोडी रुग्ण संख्या वाढली आहे. ज्या राज्यात रुग्ण संख्या वाढत आहे. त्याठिकाणच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक झाली त्यात रुग्ण गंभीर नाही, जरी रुग्ण संख्या वाढली तरी सौम्य लक्षणे असतील असा अनुमान काढला जात असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.
□ आरोग्य विभागाची परत परीक्षा
राज्यात मागच्या काळात आरोग्य भरतीमध्ये घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. आरोग्य भरती संदर्भात विधानसभेत आश्वासन दिले होते. पोलिसांना सखोल चौकशी करण्यासंदर्भात आदेश दिले होते. पोलिसांचा डिटेल अंतिम रिपोर्ट अत्यावश्यक आहे. ड वर्गाचा पेपर तो पूर्ण व्हायरल झाला होता त्यामुळे आम्ही पुन्हा ‘ड’ वर्गाची परीक्षा घेणार आहोत.
मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा केली त्यांचं ही मत लक्षात घेतलं आहे. दोन्ही ही परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय घेऊ. मंत्री मंडळाचा निर्णय आहे त्याचबरोबर नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचा देखील निर्णय ह्यात झाला असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/537886241222443/