Sunday, January 29, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

उत्तर प्रदेश सरकार मुंबईत बनवणार कार्यालय; मुंबईत सुमारे 50 ते 60 लाख नागरिक उत्तर भारतीय

Government of Uttar Pradesh to set up office in Mumbai

Surajya Digital by Surajya Digital
May 10, 2022
in Hot News, देश - विदेश, महाराष्ट्र
0
उत्तर प्रदेश सरकार मुंबईत बनवणार कार्यालय; मुंबईत सुमारे 50 ते 60 लाख नागरिक उत्तर भारतीय
0
SHARES
47
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

लखनौ : मुंबईस्थित उत्तर भारतीयांची देखभाल आणि नियोजन करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने मुंबईत कार्यालय बनवण्याचा निर्णय घेतला आहे. नोकऱ्या आणि इतर सुविधांकडे लक्ष देण्याचा यामागे उद्देश आहे. याबाबतची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. Government of Uttar Pradesh to set up office in Mumbai; About 50 to 60 lakh North Indian Yogi Adityanath in Mumbai

या कार्यालयाच्या माध्यमातून त्यांची सामाजिक सुरक्षा सुनिश्चित केली जाईल, त्याचप्रमाणे मूळ राज्यात गुंतवणूक, रोजगार, पर्यटन आदींसाठी त्यांच्याशी समन्वय साधला जाईल. मुंबईच्या 18.4 दशलक्ष लोकसंख्येपैकी सुमारे 50 ते 60 लाख नागरिक उत्तर भारतीय आहेत.

कोविड-१९ लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरितांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईतील कार्यालय महाराष्ट्रात राहणार्‍या संघटित आणि असंघटित अशा दोन्ही क्षेत्रात काम करणार्‍या उत्तर प्रदेशातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करेल आणि राज्यात गुंतवणूक आणण्याचे काम करेल, असे सांगण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योगी सरकार हे कार्यालय लवकरच मुंबईत सुरु करणार आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील जे नागरिक नोकरी, व्यवसायासाठी मुंबईत दीर्घकाळ वास्तव्य करत आहेत, त्यांच्याशी संपर्क साधला जाणार आहे. मुंबईच्या 18.4 दशलक्ष लोकसंख्येपैकी सुमारे 50 ते 60 लाख नागरिक उत्तर भारतीय आहेत. त्यात उत्तर प्रदेशातील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

परप्रांतियांशी चर्चा करुन त्यांच्यासाठी तिथे अनुकूल आणि आकर्षक औद्योगिक वातावरण निर्माण केलं जाईल. यूपीमध्ये त्यांच्या उत्पादनांना किंवा सेवांसाठी खूप मोठी बाजारपेठ आणि मागणी आहे, त्यामुळे तिथे गुंतवणूक करणं त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल, असं त्यांना सांगितलं जाईल.
याशिवाय इतर कामगारांसाठीही त्यांच्या हिताच्या योजना या कार्यालयाकडून केल्या जातील. यामुळे त्यांना कोणत्याही संकटाच्या वेळी उत्तर प्रदेशात येणं सोपं होईल आणि त्यांना त्यांच्या अनुभवानुसार आणि क्षमतेनुसार इथे काम किंवा रोजगार मिळू शकेल, असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीही असेच प्रयत्न केले जातील.

 

गेल्या अनेक वर्षापासून मुंबईत वास्तव्य आहे. कोरोना काळात देशाच्या इतर राज्यांत अडकून पडलेल्या उत्तर प्रदेशातील नागरिकांना सामाजिक-आर्थिक सुरक्षा देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली होती. या घोषणेची पुर्तता म्हणून मुंबईत उत्तर प्रदेशातील नागरिकांसाठी कार्यालयात सुरु करण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे.

 

एका सरकारी प्रवक्त्याने याबाबत सांगितले की, कोविड-१९ लॉकडाऊन दरम्यान, जेव्हा महाराष्ट्र आणि इतर राज्यातील लाखो स्थलांतरित कामगार उत्तर प्रदेशात परतले, तेव्हा सरकारला असे वाटले की विविध राज्यांमध्ये उत्तर प्रदेशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक व्यक्ती असणे आवश्यक आहे. विशेषतः ज्या ठिकाणी उत्तर प्रदेशातील जास्तीत जास्त लोक आहेत. त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी आणि संकटाच्या वेळी त्यांना मदत करण्याचा यामागे उद्देश आहे.

मुंबईतील कार्यालय कोणत्याही संकटाच्या वेळी लोकांना उत्तर प्रदेशात परत आणण्यास मदत करेल आणि त्यांना त्यांच्या अनुभव आणि क्षमतेनुसार स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यास मदत करेल. मुंबईत राहणाऱ्या स्थलांतरितांना उत्तर प्रदेशातील पर्यटन, संस्कृती आणि इतर क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या शक्यतांची जाणीव करून दिली जाईल आणि त्यांना उत्तर प्रदेशात उद्योग सुरू करण्यास प्रवृत्त केले जाईल. व्यवसायासाठी अनुकूल आणि आकर्षक वातावरणदेखील निर्माण केले जाईल, असे उत्तर प्रदेश सरकारच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले आहे.

 

Tags: #Government #UttarPradesh #setup #office #Mumbai #50to60lakh #NorthIndian #YogiAdityanath#उत्तरप्रदेश #सरकार #मुंबई #बनवणार #कार्यालय #50ते60लाख #नागरिक #उत्तर #भारतीय #योगीआदित्यनाथ
Previous Post

Pandit Shivkumar संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे निधन

Next Post

Fourth wave कोरोनाची चौथी लाट येणार, आरोग्य विभागाची परत परीक्षा घेणार : राजेश टोपेंचं मोठं विधान

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
Fourth wave कोरोनाची चौथी लाट येणार, आरोग्य विभागाची परत परीक्षा घेणार : राजेश टोपेंचं मोठं विधान

Fourth wave कोरोनाची चौथी लाट येणार, आरोग्य विभागाची परत परीक्षा घेणार : राजेश टोपेंचं मोठं विधान

वार्ता संग्रह

May 2022
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Apr   Jun »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697